
आशिया कप 2025 स्पर्धेनंतर आता टीम इंडिया रेड बॉल क्रिकेटसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आपल्या दुसऱ्या आणि मायदेशातील पहिल्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिज विरुद्ध 2 हात करणार आहे. उभयसंघात एकूण 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. शुबमन गिल याची कर्णधार म्हणून ही दुसरीच मालिका असणार आहे. शुबमनच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत राखली होती. त्यामुळे टीम इंडियाचा मायदेशात आणि डब्ल्यूटीसी 2025-2027 या साखळीत विंडीजला पराभूत करुन पहिली कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कुठे आणि कधी होणार? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
दरम्यान वेस्ट इंडिज या दौऱ्यानिमित्ताने 7 वर्षांनंतर कसोटी मालिकेसाठी भारतात आली आहे. विंडीज याआधी 2018 साली भारत दौऱ्यावर आली होती. तेव्हा टीम इंडियाने विंडीजला 2-0 अशा फरकाने पराभूत केलं होतं. त्यामुळे आता टीम इंडिया पुन्हा अशीच कामगिरी करण्यासाठी उत्सूक आहे. तर विंडीज टीम इंडियाला कशाप्रकारे आव्हान देणार? हे पाहणंही औत्सुक्यांचं ठरणार आहे.