IND vs WI: रोहित बरोबरची मैत्री विसरणार, पुढचं लक्ष्य भारत, कायरन पोलार्डची गर्जना

| Updated on: Jan 31, 2022 | 12:32 PM

या मालिका विजयानंतर कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने आपले सर्व लक्ष आगामी भारत दौऱ्यावर केंद्रीत केलं आहे.

IND vs WI: रोहित बरोबरची मैत्री विसरणार, पुढचं लक्ष्य भारत, कायरन पोलार्डची गर्जना
Rohit-pollard
Follow us on

IND vs WI Series: नुकत्याच संपलेल्या टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजने इंग्लंडचा (ENG vs WI) 3-2 असा पराभव केला. मालिकेतील शेवटच्या निर्णायक सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा 17 धावांनी पराभव केला. हा विजय वेस्ट इंडिजच्या संघासाठी बुस्टर डोस ठरणार आहे. भारत दौऱ्याआधी निश्चित त्यांचा आत्मविश्वास उंचावेल. या मालिका विजयानंतर कायरन पोलार्डच्या (Kieron Pollard) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने आपले सर्व लक्ष आगामी भारत दौऱ्यावर केंद्रीत केलं आहे. “कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाविरुद्ध खेळण्यास मी खूपच उत्सुक्त आहे. माझ्यासाठी हे विशेष असेल” असं पोलार्डने म्हटलं आहे. येत्या 6 फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये वनडे मालिका सुरु होणार आहे.

“इंग्लंड विरुद्ध चांगला विजय मिळवला. आता भारत दौऱ्यात अशाच पद्धतीचा सकारात्मक खेळण्याचा आमचा प्रयत्न असेल. रोहित शर्मा नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाविरुद्ध खेळण्यास आम्ही उत्सुक्त आहोत. आमच्यासाठीही ही विशेष सीरीज आहे” असे पोलार्ड इंग्लंडला पराभूत केल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला. इनसाइड स्पोर्टने हे वृत्त दिलं आहे.

पोलार्डला 6 कोटी रुपयांना रिटेन केलं
कायरन पोलार्ड आणि रोहित शर्मा दोघे परस्परांचे चांगले मित्र आहेत. पोलार्ड रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सकडून खेळतो. मुंबई इंडियन्सने दोघांनाही 2022 च्या मोसमासाठी रिटेन केलं आहे. रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी) आणि कायरन पोलार्ड (6 कोटी) या चार जणांना मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात कायम ठेवलं आहे.

चांगले वनडे खेळाडू लाभले
आता आयपीएल 2022 आधी रोहित आणि पोलार्ड दोघेही आपल्या देशांच्या संघांचे नेतृत्व करतील. महिन्याभराने एकत्र खेळताना दिसणारे हे दोन्ही खेळाडू पुढच्या आठवड्यात परस्पराविरोधात मैदानावर उतरतील. “आम्हाला खरोखर काही चांगले वनडे खेळाडू लाभले आहेत. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत काही नवीन प्रतिभावान खेळाडू गवसले आहेत. भारतातही ते चांगली कामगिरी कायम ठेवतील, याची आम्हाला खात्री आहे” असं पोलार्ड म्हणाला.

IND vs WI Series Kieron Pollard says Looking forward to India series playing against Rohit Sharma led team will be special