IND vs ENG 1st T 20: रोहित शर्मा IN झाल्यामुळे पुणेकराची संधी हुकणार, उद्या Playing-11 मध्ये कोणाला संधी मिळणार?

| Updated on: Jul 06, 2022 | 2:22 PM

IND vs ENG 1st T 20: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये गुरुवारपासून टी 20 सीरीज सुरु होत आहे. एजबॅस्टन कसोटी गमावल्यानंतर टीम इंडिया सीरीजमध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न करेल.

IND vs ENG 1st T 20: रोहित शर्मा IN झाल्यामुळे पुणेकराची संधी हुकणार, उद्या Playing-11 मध्ये कोणाला संधी मिळणार?
Team india
Follow us on

मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये गुरुवारपासून टी 20 सीरीज सुरु होत आहे. एजबॅस्टन कसोटी गमावल्यानंतर टीम इंडिया सीरीजमध्ये पलटवार करण्याचा प्रयत्न करेल. पहिला सामना साऊथम्पटन मध्ये खेळला जाणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यात नेतृत्व करताना दिसेल. रोहित शर्मा कोरोनामधून बरा झाला आहे. रोहित शर्माने टी 20 सीरीजसाठी (T 20 Series) जोरदार सराव केला. आता त्याला मैदानावर परफॉर्मन्स दाखवावा लागेल. इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडिया कुठल्या प्लेइंग 11 सह उतरणार हा प्रश्न आहे. पहिल्या सामन्यात विराट-पंत आणि बुमराह खेळणार नाहीयत. त्यामुळे रोहित शर्मा कुठल्याही खेळाडूंना संधी देतो, त्याची उत्सुक्ता आहे.

विकेटकिपिंग कोण करणार?

रोहित शर्मा कॅप्टनच आहे. त्यामुळे तो उद्याच्या सामन्यात खेळेल. पण त्याचवेळी पुणेकर ऋतुराज गायकवाडला संघातील आपलं स्थान गमवाव लागणार आहे. रोहित सोबत इशान किशन सलामीला उतरेल. आयर्लंड विरुद्ध टी 20 सीरीज खेळणारा संघ इंग्लंड विरुद्ध मैदानात उतरवला जाईल. दीपक हुड्डाला तिसऱ्या स्थानावर संधी दिली जाऊ शकते. सूर्यकुमार यादवही संघाचा भाग असणार आहे. ऋषभ पंतच्या अनुपस्थित दिनेश कार्तिककडे विकेटकीपिंगची जबाबदारी असेल. अक्षर पटेलचा ऑलराऊंडर म्हणून संघात समावेश होऊ शकतो. हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि आवेश खान या तिघांना संधी मिळू शकते. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह या दोघांपैकी टीम मॅनेजमेंट कोणाला संधी देईल का? हा प्रश्न आहे.

परदेशात कॅप्टन म्हणून रोहितचा पहिला सामना

रोहित शर्मा टीम इंडियाचा फुल टाइम कॅप्टन बनून सात महिने झालेत. पण या दरम्यान त्याने एकदाही परदेशात भारतीय संघाचं नेतृत्व केलेलं नाही. इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरीजमधली पहिली मॅच हा परदेशातील कॅप्टन म्हणून त्याचा पहिला सामना आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी रोहित शर्माला दुखापत झाली होती. एजबॅस्टन कसोटीआधी त्याला कोरोना झाला होता.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन,), इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार,