IND vs AFG | टीम इंडियामध्ये रोहितची एन्ट्री, ‘या’ हुकमी खेळाडूचा पत्ता होणार कट

IND vs AFG T20 Series : टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. या मालिकेमध्ये हिटमॅन संघाचा कर्णधार आहे. मात्र हिटमॅनच्या येण्याने एक खेळाडूचा पत्ता कट झालाय.

IND vs AFG | टीम इंडियामध्ये रोहितची एन्ट्री, या हुकमी खेळाडूचा पत्ता होणार कट
rohit sharma Captain against Afganistan T20 Series
| Updated on: Jan 08, 2024 | 12:09 PM

मुंबई : अफगाणिस्ताविरूद्धच्या टी-20 मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणी केली आहे. या मालिकेमध्ये रोहित शर्माकडे कर्णधारपद देण्यात आलं आहे. रोहित शर्मा याची टी-20 संघामध्ये एन्ट्री झाली आहे. वर्ल्ड कप आधी टीम इंडियासाठीसाठी अफगाणिस्तानविरूद्धची टी-20 मालिका महत्त्वाची आहे. मात्र रोहित संघात आल्याने एका खेळाडूसाठी वाईट बातमी आहे. कारण रोहित संघात आल्यामुळे या खेळाडूला संघात जागा भेटणार नाही. कोण आहे हा खेळाडू जाणून घ्या.

हुकमी खेळाडूचा पत्ता होणार कट

रोहित शर्मा आता टी-20 चा कॅप्टन झाल्यामुळे तो प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसणार आहे. मात्र यामुळे एका हुकमी खेळाडूला प्लेइंग 11 मध्ये जागा मिळणार नाही. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून यशस्वी जयस्वाल आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दोन्हीसुद्धा सीनिअर खेळाडू असल्याने दोघेही खेळणार हे नक्की आहे. दोन खेळाडू संघात आल्याने प्लेइंग 11 मध्ये ओपनिंगला रोहित शर्मासोबत शुबमन गिल आणि तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळतील. त्यामुळे जयस्वाल याला संधी मिळणार नाही. कारण शुबमन गिल संघातील महत्त्वाचा खेळाडू असून टीम मॅनेजमेंट त्याला बसवणार नाही.

टीम इंडियाची शेवटची टी-20 मालिका आफ्रिकेविरूद्ध झाली होती. या मालिकेमध्ये टीम इंडियाचं कर्णधारपद सुर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आलं होतं. मात्र सूर्या जखमी असल्यामुळे या मालिकेमध्ये खेळताना दिसणार नाही. यंदा होणाऱ्या वर्ल्ड कप आधी टीम इंडियाची एकमेव टी-20 मालिका असणार आहे. त्यामुळे रोहित अँड कंपनी या मालिकेमध्ये छाप सोडताना दिसतील.

टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील सामने

पहिला सामना, 11 जानेवारी, मोहाली.
दुसरा सामना, 14 जानेवारी, इंदूर.
तिसरा सामना , 17 जानेवारी, बंगळुरु

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.