IND vs AFG | अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया जाहीर, रोहित शर्मा कॅप्टन

India vs Afghanistan T20i Series | बीसीसीआयने टी 20 सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीममध्ये रोहित शर्मा-विराट कोहली परतले आहेत. तर दुखापतीमुळे बऱ्याच खेळाडूंना दुखापतीमुळे स्थान देण्यात आलेलं नाही.

IND vs AFG | अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया जाहीर, रोहित शर्मा कॅप्टन
rohit sharma Captain against Afganistan T20 Series
Follow us
| Updated on: Jan 07, 2024 | 8:36 PM

मुंबई | अफगाणिस्तान टीम इंडिया विरुद्ध टी 20 मालिका खेळणार आहे. एकूण 3 सामन्यांची ही टी 20 मालिका असणार आहे. या मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. टीममध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची एन्ट्री झाली आहे. रोहित शर्मा याला टीम इंडियाच्या कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली आहे.

एका बाजूला विराट कोहली आणि रोहित शर्मा परतल्याचा क्रिकेट चाहत्यांना आनंद आहे. तर दुसऱ्या बाजूला एका झटक्यात 4 खेळाडू हे मालिकेत नसणार आहेत. हार्दिक पंड्या, ऋतुराज गायकवाड आणि सूर्यकुमार यादव या तिघांना दुखापतीमुळे खेळता येणार नाही. तसेच ईशान किशनही अफगाणिस्तान विरुद्ध खेळणार नाही. तर जितेश शर्मा आणि संजू सॅमसन या दोघांना विकेटकीपर म्हणून संधी देण्यात आली आहे.

टीम इंडियाची घोषणा

टीम इंडिया-अफगाणिस्तान टी 20 सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, 11 जानेवारी, मोहाली.

दुसरा सामना, 14 जानेवारी, इंदूर.

तिसरा सामना , 17 जानेवारी, बंगळुरु

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.