IND vs SA, Live Score, 1st Test Day 5: भारताने 113 धावांनी पहिला कसोटी सामना जिंकला

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेंच्युरियन कसोटीचा आज पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात 174 धावा करून भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

IND vs SA, Live Score, 1st Test Day 5: भारताने 113 धावांनी पहिला कसोटी सामना जिंकला
India vs South Africa 2021
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 7:06 PM

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सेंच्युरियन कसोटीचा आज पाचवा आणि शेवटचा दिवस होता . चौथ्या दिवशी सुपर स्पोर्ट पार्क स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने दमदार कामगिरी केली आहे. सेंच्युरियनवर भारताने ऐतिहासिक कसोटी विजयाची नोंद केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 धावांचे लक्ष्य दिले होते. पण दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव संपुष्टात आला. भारताने इतक्या धावांनी विजय मिळवला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर आहे.

भारतीय संघ : केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर. अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर

द. आफ्रिकेचा संघ : डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, कीगन पीटरसन, रासी वॅन डर डुसॅ, टेंबा बावुमा, क्विंटन डिकॉक, वियान मुल्डर, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी निगीडी, मार्को जॅनसेन