IND vs AUS: 5 बॉल ऑस्ट्रेलियावर पडले भारी, जाणून घ्या टीम इंडियाच्या विजयाचे 3 टर्निंग पॉइंट

IND vs AUS: टीम इंडियाला सीरीज जिंकून देणारे मॅचमधील ते 3 टर्निंग पॉइंट कुठले?

IND vs AUS: 5 बॉल ऑस्ट्रेलियावर पडले भारी, जाणून घ्या टीम इंडियाच्या विजयाचे 3 टर्निंग पॉइंट
virat kohli
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 26, 2022 | 1:06 PM

मुंबई: टीम इंडियाने अखेर हैदराबादमध्ये अपेक्षित यश मिळवून दाखवलं. सीरीजची सुरुवात चांगली झाली नव्हती. पण शेवटचे दोन सामने जिंकून त्यांनी ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मालिका विजय मिळवला. हैदराबादमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हर्समध्ये 186 धावांचा डोंगर उभा केला. पण टीम इंडियाने एक चेंडू राखून विजय मिळवला.

सूर्यकुमार यादव टीम इंडियाच्या विजयाचा हिरो आहे. पण या मॅचमध्ये टीम इंडियाच्या विजयाचे 3 टर्निंग पॉइंट ठरले.

अक्षरच्या एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट 

टीम इंडियाच्या विजयात सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या शतकी भागीदारीची चर्चा होत आहे. पण टीम इंडियाच्या विजयाचा पाया 14 व्या ओव्हरमध्ये रचला गेला. अक्षर पटेलने आपल्या ओव्हरमध्ये 2 मोठ्या विकेट काढल्या. अक्षरने आधी इंग्लिसला आऊट केलं. त्यानंतर पाचव्या चेंडूवर मॅथ्यू वेडला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. वेड सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे.

हर्षल पटेलची लास्ट ओव्हर 

हर्षल पटेलची 20 वी ओव्हर ऑस्ट्रेलियाला भारी पडली. आपल्या शेवटच्या ओव्हरमध्ये हर्षलने फक्त 7 धावा दिल्या. त्याच्या पहिल्या चेंडूवर टिम डेविडने षटकार खेचला. लास्ट ओव्हरचा दुसरा चेंडू हर्षलने निर्धाव टाकला. तिसऱ्या चेंडूवर त्याने डेविडला बाद केलं. चौथ्या बॉलवर सॅम्स रन्स काढू शकला नाही. पाचव्या चेंडूवर एक धाव गेली. शेवटचा चेंडू हर्षलने कमिन्सला निर्धाव टाकला. लास्ट ओव्हरमध्ये फक्त 7 धावा टी 20 क्रिकेटमध्ये परवडत नाहीत.

विराटचा सिक्स 

विराट कोहलीचा सिक्स सुद्धा टर्निंग पॉइंट ठरला. लास्ट ओव्हरमध्ये विराटने सिक्स मारला. त्यावेळी 6 बॉलमध्ये विजयासाठी 11 धावांची गरज होती. डॅनियल सॅम्सच्या पहिल्या बॉलवर त्याने सिक्स मारला. कोहली पुढच्याच चेंडूवर आऊट झाला. पण हा सिक्स टीमसाठी महत्त्वाचा होता. शेवटच्या 2 चेंडूत विजयासाठी 4 धावांची गरज होती. हार्दिकने चौकार ठोकून टीम इंडियाला मालिका विजय मिळवून दिला.