IND vs AUS 3rd Test : तिसऱ्या कसोटीत रोहित शर्माने चूक सुधारली, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल

IND vs AUS 3rd Test : टीम इंडियासाठी हा कसोटी सामना महत्त्वाचा आहे. कारण WTC च्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम इंडियाला हा कसोटी सामना जिंकावाच लागेल. कॅप्टन रोहित शर्माने आज टॉस जिंकला.

IND vs AUS 3rd Test : तिसऱ्या कसोटीत रोहित शर्माने चूक सुधारली, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल
Team indiaImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 9:32 AM

IND vs AUS 3rd Test : बॉर्डर-गावस्कर सीरीजचा तिसरा कसोटी सामना आजपासून सुरु होत आहे. इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. या कसोटीत टॉस भारताने जिंकला. कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टॉसनंतर दोन्ही टीम्सनी आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली. रोहित शर्माने अखेर तिसऱ्या कसोटी सामन्यात आपली चूक सुधारली आहे. त्याने फ्लॉप असलेल्या केएल राहुलला ड्रॉप करुन त्याच्याजागी शुभमन गिलला संधी दिली आहे.

4 टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये टीम इंडिया 2-0 ने आघाडीवर आहे. म्हणजे भारत आता सीरीज गमावणार नाही. गतविजेता असल्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आता भारताकडेच रहाणार आहे. पण इंदोर कसोटी जिंकणं टीम इंडियासाठी महत्त्वाच आहे. कारण इंदोर टेस्ट जिंकल्यास टीम इंडियासाठी WTC फायनलच तिकीट पक्कं होईल.

मोहम्मद शमी ड्रॉप

WTC फायनलमधील प्रवेशाच गणित लक्षात घेता, टीम इंडियाने इंदोर कसोटीत आपला मजबूत संघ उतरवला आहे. टीम इंडियाने या कसोटीसाठी निवडलेल्या प्लेइंग 11 वरुन ते लक्षात येतं. दोन्ही टीम्सनी आपल्या प्लेइंग 11 मध्ये दोन-दोन बदल केले आहेत. भारतीय टीममध्ये केएल राहुलच्या रुपात एक महत्त्वपूर्ण बदल झालाय. त्याला ड्रॉप करुन शुभमन गिलला संधी दिलीय. दुसरा बदल गोलंदाजीत आहे. मोहम्मद शमीच्या जागी उमेश यादवला स्थान दिलय.

रोहितने चूक सुधारली

केएल राहुलला टीममधून ड्रॉप करण्याची मागणी बऱ्याच महिन्यांपासून होत आहे. राहुल फॉर्ममध्ये नाहीय. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यातही त्याच प्रदर्शन खास नाहीय. केएल राहुलवरुन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. राहुलला ड्रॉप करण्याची सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींची मागणी होती. पण दिग्गज खेळाडूंमध्ये त्यावरुन दोन गट पडले आहेत. राहुल टॅलेंटेड असल्याने त्याला संधी द्यावी, असं काही जणांचा मत आहे. इंदोर टेस्टसाठी दोन्ही टीम्सची प्लेइंग इलेव्हन

भारताची प्लेइंग XI: रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाची प्लेइंग XI: ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कॅप्टन), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नाथन लॉयन, मॅथ्यू कुहनेमन

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.