IND vs ENG: हार्दिक पंड्याने 7 बॉल मध्ये इंग्रजांना जमिनीवर आणलं, पहा VIDEO

IND vs ENG: हार्दिक पंड्या (Hardik pandya) सध्या शानदार फॉर्म मध्ये आहे. कर्णधारपद असो, फलंदाजी किंवा गोलंदाजी, हार्दिकने सगळ्या जागा व्यापून टाकल्या आहेत.

IND vs ENG: हार्दिक पंड्याने 7 बॉल मध्ये इंग्रजांना जमिनीवर आणलं, पहा VIDEO
hardik-pandya
Image Credit source: AFP
| Updated on: Jul 08, 2022 | 1:31 PM

मुंबई: हार्दिक पंड्या (Hardik pandya) सध्या शानदार फॉर्म मध्ये आहे. कर्णधारपद असो, फलंदाजी किंवा गोलंदाजी, हार्दिकने सगळ्या जागा व्यापून टाकल्या आहेत. आधी आयपीएल 2022 (IPL 2022) त्यानंतर आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामन्यात हार्दिकच कुशल नेतृत्व दिसून आलं. काल इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात हार्दिकचा जलवा दिसला. त्याने 51 धावांची अर्धशतकी खेळी केली व चार महत्त्वपूर्ण विकेट काढल्या. या सामन्यात हार्दिकने अवघ्या 7 चेंडूत इंग्लंडच कंबरड मोडलं. पंड्याच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या धुरंधर फलंदाजांनी शरणागती पत्करली. कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) पाचव्या षटकात हार्दिककडे चेंडू सोपवला. त्याच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर डेविड मलानने चौकार ठोकला. पण त्यानंतर पुढच्याच चेंडूवर पंड्याने आपली करामत दाखवली.

आधी चौकार खाल्ला नंतर कंबरड मोडलं

पहिल्या चेंडूवर चौकार खालल्यानंतर पुढच्या सात चेंडूत हार्दिकने इंग्लंडच कंबरड मोडून टाकलं. पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हार्दिकने मलानला बोल्ड केलं. त्याने षटकातील अखेरच्या चेंडूवर त्याने घातक लियाम लिव्हिंगस्टोनला खातही उघडू दिलं नाही. लिव्हिंगस्टोनला शुन्यावर दिनेश कार्तिककरवी झेलबाद केलं. पाचव्या नंतर सातव्या षटकातही हार्दिक पंड्याचा भन्नाट खेळ कायम होता. त्याने षटकातील पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयला हर्षल पटेलकरवी झेलबाद केलं.

पहिल्या 7 चेंडूत 3 मोठ्या विकेट

आपल्या पहिल्या षटकात हार्दिक पंड्याने 6 धावात दोन विकेट काढल्या. हार्दिकने पहिल्या सात चेंडूत मलान, लिव्हिंगस्टोन आणि रॉयला बाद करुन यजमानांना जोरदार दणका दिला. पंड्याने सीरीजमधील पहिल्याच टी 20 सामन्यात चार षटकात 33 धावा देत चार विकेट घेतल्या. सॅम करन त्याचा चौथा बळी ठरला. एका इंटरनॅशनल सामन्यात अर्धशतक झळवणारा आणि चार विकेट घेणारा हार्दिक पंड्या पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. असा कारनामा करणारा क्रिकेट विश्वातील तो चौथा खेळाडू आहे. पंड्याला टी 20 मधील आपल्या पहिल्या अर्धशतकासाठी 61 सामन्यांची प्रतिक्षा करावी लागली. त्याने 2016 साली टी 20 मध्ये डेब्यु केला होता.