IND vs ENG 2nd T20 Playing 11: इन फॉर्म दीपक हुड्डा, कार्तिकसह चार खेळाडूंना दुसऱ्या टी 20 सामन्यात बाहेर बसवण्याची शक्यता

IND vs ENG 2nd T20 Playing 11: काल पहिल्या टी 20 सामन्यात भारताने इंग्लंडवर (IND vs ENG) 50 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. आता उद्या शनिवारी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ मालिका विजयाच्या इराद्याने उतरेल.

IND vs ENG 2nd T20 Playing 11: इन फॉर्म दीपक हुड्डा, कार्तिकसह चार खेळाडूंना दुसऱ्या टी 20 सामन्यात बाहेर बसवण्याची शक्यता
deepak-Hooda
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 08, 2022 | 5:21 PM

मुंबई: काल पहिल्या टी 20 सामन्यात भारताने इंग्लंडवर (IND vs ENG) 50 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. आता उद्या शनिवारी होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ मालिका विजयाच्या इराद्याने उतरेल. या सामन्याच्यावेळी भारतीय संघात अनेक बदल होतील. रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाच्या  प्लेइंग 11 (Playing 11) मध्ये चार बदल होऊ शकतात. पहिल्या टी 20 सामन्यात दमदार प्रदर्शन करणाऱ्या काही खेळाडूंना बाहेर बसवलं जाऊ शकतं. दुसऱ्या टी 20 साठी विराट कोहलीचा प्लेइंग 11 मध्ये समावेश निश्चित आहे. विराट आपला शेवटचा टी 20 सामना फेब्रुवारी महिन्यात खेळला होता. 2021 टी 20 वर्ल्ड कप नंतर विराट फक्त दोन टी 20 सामने खेळला आहे. सध्या चांगल्या फॉर्म मध्ये असलेल्या दीपक हुड्डाच्या (Deepak Hooda) जागी विराट कोहलीचा संघात समावेश होईल. टीम इंडियात काय चार बदल होऊ शकतात, ते समजून घेऊया.

  1. टीम इंडियात पहिला बदल विराट कोहलीच्या रुपाने होईल. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. दीपक हुड्डाच्या जागी त्याला संधी मिळू शकते. दीपक हुड्डाने आयर्लंड विरुद्ध शानदार शतक झळकावलं होतं. इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यातही त्याने 17 चेंडूत 33 धावा केल्या.
  2. टीम इंडियात दुसरा बदल ऋषभ पंतच्या समावेशाने होईल. तो विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकची जागा घेऊ शकतो. पंत टी 20 मध्ये विशेष फॉर्म मध्ये नाहीय. दिनेश कार्तिकने स्वत:ला सिद्ध केलय. पण तरीही त्याला बेंचवर बसाव लागू शकतं. ऋषभ पंतने नुकत्याच संपलेल्या एजबॅस्टन कसोटीत शतकी खेळी साकारली होती.
  3. टीम इंडियात तिसरा बदल रवींद्र जाडेजामुळे होईल. अक्षर पटेलला बेंचवर बसावं लागू शकतं. अक्षर पटेल गोलंदाजीमध्ये विशेष चमक दाखवत नाहीय. रवींद्र जाडेजा त्याची जागा घेणारं, हे निश्चित मानलं जातय. जाडेजाने नुकत्या संपलेल्या एजबॅस्टन कसोटीत पहिल्या डावात शतक झळकावलं होतं.
  4. जसप्रीत बुमराहचा प्लेइंग 11 मध्ये समावेश होईल. तो कालच्या सामन्यात डेब्यु करणाऱ्या अर्शदीप सिंहची जागा घेईल. बुमराह दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 सामन्यात खेळेल. अर्शदीपने पहिल्या टी 20 सामन्यात दोन विकेट काढले होते. पहिलचं षटक त्याने निर्धाव टाकलं होतं.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल