IND vs ENG: रविचंद्रन अश्विन-ऋषभ पंत संघात असूनही जसप्रीत बुमराहच इंग्लंड विरुद्ध कॅप्टन का? समजून घ्या….

| Updated on: Jun 30, 2022 | 4:17 PM

IND vs ENG: रोहित शर्मा खेळण्यासाठी फिट आहे की नाही, ते आज स्पष्ट होईल. रोहित अनफिट ठरल्यास त्याच्या जागी जसप्रीत बुमराहकडे (Jasprit bumrah) संघाचं नेतृत्व जाण्याची शक्यता आहे.

IND vs ENG: रविचंद्रन अश्विन-ऋषभ पंत संघात असूनही जसप्रीत बुमराहच इंग्लंड विरुद्ध कॅप्टन का? समजून घ्या....
R ashwin
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: कॅप्टन रोहित शर्मा (Rohit sharma) एजबॅस्टन कसोटीत खेळणार की, नाही, या बद्दल अजून स्पष्टता नाहीय. काल काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये रोहित शर्मा खेळणार नसल्याचं म्हटलं होतं. पण नंतर हे़ड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी रोहित शर्मा खेळू शकतो, त्याच्या दोन चाचण्यांच्या रिपोर्ट्सवर सर्व काही अवलंबून असल्याचं सांगितलं. रोहित शर्माला सराव सामन्यादरम्यान कोरोना व्हायरसची लागण झाली. रोहित शर्मा खेळण्यासाठी फिट आहे की नाही, ते आज स्पष्ट होईल. रोहित अनफिट ठरल्यास त्याच्या जागी जसप्रीत बुमराहकडे (Jasprit bumrah) संघाचं नेतृत्व जाण्याची शक्यता आहे. खरंतर गोलंदाजांना कॅप्टन बनवण्याच्या निर्णयाने अनेकांच्या भुवया आताच उंचावल्या आहेत. पण निवड समिती इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या अखेरच्या कसोटीसाठी जसप्रीत बुमराहच्या नावाचा कॅप्टन म्हणून विचार करतेय. उपकर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे ही मालिका खेळत नाहीय.

जसप्रीत बुमराहच का?

संघामध्ये रविचंद्रन अश्विन, ऋषभ पंत यांच्यासारखे खेळाडू असतानाही, जसप्रीत बुमराहच्या नावाचा कॅप्टनशिपसाठी विचार का होतोय? त्यामागे काही कारणं आहेत. क्रिकबजने दिलेल्या वृत्तानुसार, कॅप्टनशिपसाठी आर. अश्विन आणि ऋषभ पंतच्या नावाची चर्चा झाली. पण शिक्कामोर्तब बुमराहच्या नावावरच झालं.

‘या’ कारणांमुळे अश्विन-पंतची संधी हुकली

आर.अश्विन आणि ऋषभ पंतला कॅप्टन न बनवण्यामागे एक कारण आहे. अश्विनला नुकताच कोविड झाला होता. त्यातून तो सावरतोय. हे त्याला कॅप्टन न बनवण्यामागचं एक कारण आहे. त्याशिवाय अश्विन इंग्लंड विरुद्ध मागच्या चार कसोटी सामन्यात खेळलाही नाहीय. ऋषभ पंतला अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कॅप्टनशिपची संधी दिली होती. पण त्याचा खराब रेकॉर्ड कॅप्टनशिपच्या मार्गात आडवा आला. दुसऱ्याबाजूला जसप्रीत बुमराह फिट आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक मोठा अनुभव त्याच्याकडे आहे. त्यामुळे बुमराहच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलय.

मालिकेत भारताकडे आघाडी

सीरीज मध्ये भारत सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. भारताकडे 15 वर्षानंतर मालिका विजयाची संधी आहे. मागच्यावर्षी कोविडमुळे मालिकेतील उरलेला एक कसोटी सामना रद्द करावा लागला होता. मँचेस्टर मध्ये होणारा कसोटी सामना आता एजबॅस्टनमध्ये होत आहे.