India vs Ireland 2nd T 20 Playing 11 Prediction: पुण्याच्या ऋतुराज गायकवाडला बसवून संजू सॅमसनला संघात IN करणार का?

| Updated on: Jun 28, 2022 | 10:34 AM

हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाने लौकीकाला साजेसा खेळ केला. दुसऱ्यासामन्यातही ते तसाच खेळ दाखवतील अशी अपेक्षा आहे.

India vs Ireland 2nd T 20 Playing 11 Prediction: पुण्याच्या ऋतुराज गायकवाडला बसवून संजू सॅमसनला संघात IN करणार का?
india vs ireland
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: भारत आणि आयर्लंड (IND vs IRE ) मध्ये टी 20 सामन्यांची मालिका रविवारी 26 जूनला सुरु झाली. पहिला सामन्यात भारताने दुबळ्या आयर्लंडवर 7 विकेट राखून विजय मिळवला. आज 28 जूनला दुसरा सामना होणार आहे. हा मालिकेतील शेवटचा सामना आहे. भारत आणि आयर्लंडमध्ये फक्त दोन टी 20 सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली होती. हार्दिक पंड्याच्या (Hardik pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. पहिल्या मॅचमध्ये टीम इंडियाने लौकीकाला साजेसा खेळ केला. दुसऱ्यासामन्यातही ते तसाच खेळ दाखवतील अशी अपेक्षा आहे. पहिल्या सामन्यात पावसाने व्यत्यय (Rain) आणला होता. त्यामुळे 20 ऐवजी 12 षटकांचा सामना खेळवण्यात आला. दुसरा टी 20 सामनाही आयर्लंडची राजधानी डब्लिनच्या मालाहाइड मध्ये होईल. पहिल्या सामन्यात भारताने सहज विजय मिळवला. पण काही बाबतीत फॅन्स थोडे निराश झाले होते. उमरान मलिकला अपेक्षित डेब्यू करता आला नाही. दुसऱ्याबाजूला ऋतुराज गायकवाडला झालेली दुखापत.

ऋतुराज गायकवाडला वगळणार?

ऋतुराज गायकवाडच्या जागी संघात बदल होऊ शकतो. खराब फॉर्म असूनही ऋतुराज गायकवाडला संघात संधी मिळाली होती. पण या दरम्यान त्याला दुखापत झाली. त्यामुळे तो फलंदाजीला उतरु शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात त्याला बाहेर बसवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. असं झाल्यास, त्याच्याजागी संजू सॅमसनचा संघात समावेश होऊ शकतो. संजू सॅमसनचा पहिल्या सामन्यासाठी संघात समावेश केला नव्हता. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. फलंदाजीमध्ये या व्यतिरिक्त दुसऱ्याबदलाची शक्यता नाहीय.

उमरानला पुन्हा संधी मिळू शकते

गोलंदाजीमध्ये उमरान मलिकच्या नावाची चर्चा आहे. बऱ्याच प्रतिक्षेनंतर त्याने आयर्लंड विरुद्ध डेब्यू केला होता. पण पावसामुळे बिघाड झाला. सामना 20 ऐवजी 12 षटकाचा झाला. त्यात उमरानच्या वाट्याला फक्त 1 ओव्हर आली. पहिल्या षटकात त्याने जास्त धावा दिल्या. तो थोडा महागडा ठरला. त्याला दुसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यती आहे. कारण एक ओव्हर देऊन त्याला बसवणं योग्य रहाणार नाही.

गोलंदाजीत होऊ शकतो बदल

गोलंदाजीत एक बदल होण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही पावसाचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. टीम इंडिया स्पिनर अक्षर पटेलला बाहेर बसवू शकते. कारण मागच्या सामन्यात तो महागडा गोलंदाज ठरलेला. त्याच्याजागी हर्षल पटेल किंवा अर्शदीप सिंहला संधी मिळू शकते.

IND vs IRE: दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी संभाव्य Playing 11

भारतीय संघ – हार्दिक पंड्या (कॅप्टन), इशान किशन, सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड/संजू सॅमसन, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, अर्शदीप/हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल, उमरान मलिक,