India vs Ireland, 2nd T20, Match Preview: आयर्लंड मधूनच निघणार इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचा मार्ग, उमरानकडे एक चान्स

भारत आणि आयर्लंडमध्ये (IND vs IRE) मंगळवारी दुसरा आणि शेवटचा टी 20 सामना खेळला जाणार आहे. भारताने 7 विकेट राखून पहिला टी 20 सामना जिंकला होता.

India vs Ireland, 2nd T20, Match Preview: आयर्लंड मधूनच निघणार इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचा मार्ग, उमरानकडे एक चान्स
Ind vs Ire
Image Credit source: BCCI
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 27, 2022 | 6:38 PM

मुंबई: भारत आणि आयर्लंडमध्ये (IND vs IRE) मंगळवारी दुसरा आणि शेवटचा टी 20 सामना खेळला जाणार आहे. भारताने 7 विकेट राखून पहिला टी 20 सामना जिंकला होता. पहिल्या टी 20 सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि उमरान मलिक (Umran Malik) चमक दाखवू शकले नाहीत. हार्दिक पंड्याला या दोघांकडून चांगल्या कामगिरीची आणि हवामान चांगलं राहील अशी अपेक्षा असेल. पावसामुळे पहिला टी 20 सामना 20 ऐवजी 12 षटकांचा करण्यात आला होता. उद्या होणाऱ्या सामन्यातही पाऊल व्यत्यय आणू शकतो. दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड पहिल्या टी 20 सामन्यात फलंदाजी करु शकला नाही. पुढच्या महिन्यात इंग्लंड विरुद्ध तीन टी 20 सामन्याची सीरीज होणार आहे. त्यासाठी मजबूत संघ मैदानात उतरवला जाईल. त्यासाठी आयर्लंड़ दौरा हा युवा खेळाडूंकडे आपली क्षमता दाखवण्याची संधी आहे. इंग्लंड विरुद्धच्या सीरीजमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा वर्ल्ड कपसाठी निवडल्या जाणाऱ्या संघात जास्त विचार होऊ शकतो.

उमरानकडे एक चान्स

कालच्या सामन्यात उमरान मलिकला फक्त एकच ओव्हर टाकता आली. तो सामन्यातील सहावी ओव्हर टाकत होता. हॅरी टॅक्टरने उमरानच्या वेगाचा पुरेपूर फायदा उचलला. कॅप्टन हार्दिक पंड्या आधीच म्हणाला आहे की, उमरान मलिक जुन्या चेंडूने चांगली गोलंदाजी करतो. त्यामुळे त्याला पावरप्ले नंतर गोलंदाजी दिली. इंग्लंड सीरीज लक्षात घेता उमरानला उद्या संधी मिळाली, तर सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. तरच इंग्लंड आणि त्यानंतर वर्ल्ड कपची संधी मिळू शकते.

टेक्टरला रोखण्याचं आव्हान

भुवनेश्वर कुमार दोन्ही बाजूंना चेंडू स्विंग करतो. त्यामुळे त्याने आयर्लंडच्या फलंदाजांना सतावलं. आवेश खान डेथ ओव्हर्समध्ये अपेक्षेनुसार गोलंदाजी करु शकला नाही. भारतीय गोलंदाजांना टेक्टरला रोखावं लागेल. टी 20 क्रिकेटमध्ये तो बिनधास्त फलंदाजी करतो.

आयर्लंडच्या गोलंदाजांना सुधारणा करावी लागेल

कालच्या सामन्यात आयर्लंडच्या फलंदाजांनी निराश केलं नाही. पण गोलंदाजांना कामगिरी सुधारावी लागेल. वेगवान गोलंदाज फॉर्मसाठी चाचपडत होते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें