India vs Ireland T20I Head to Head: आयर्लंडशी मुकाबला, आकड्यांच्या खेळात टीम इंडियाच सरस, पण….

| Updated on: Jun 25, 2022 | 3:14 PM

भारतीय संघाच्या आयर्लंड दौऱ्याला (India Ireland Tour) रविवारपासून सुरुवात होत आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध (IND vs IRE) दोन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

India vs Ireland T20I Head to Head: आयर्लंडशी मुकाबला, आकड्यांच्या खेळात टीम इंडियाच सरस, पण....
ind vs ire
Follow us on

मुंबई: भारतीय संघाच्या आयर्लंड दौऱ्याला (India Ireland Tour) रविवारपासून सुरुवात होत आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध (IND vs IRE) दोन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर ही सीरीज महत्वाची मानली जात आहे. हा दौरा त्यानंतर इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेनंतर टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया कशी असेल? ते स्पष्ट होईल. भारताचा एक संघ इंग्लंडमध्ये असून ते कसोटी सामन्याची तयारी करत आहेत. सध्या त्यांचा सराव सामना सुरु आहे. आयर्लंड सीरीजसाठी हार्दिक पंड्याला कॅप्टन बनवण्यात आलं असून अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. युवा खेळाडूंनी भरलेली टीम इंडिया अनुभवाने कमी असलेल्या आयरिश संघाला कमी लेखणार नाही. कारण आयर्लंडचा कॅप्टन अँडी बालबिर्नी, कुर्टीस कॅम्फर हे चांगले खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या खेळाने छाप उमटवली आहे. आयरिश टीम मधील काही खेळाडूंकडे टी 20 क्रिकेट खेळण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांना कमजोर समजता येणार नाही.

कोणाचं पारड जड?

या सीरीज आधी दोन्ही संघांचे आकडे बघितले, तर भारताचं पारड जड आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये तीन टी 20 सामने झाले आहेत. या तिन्ही मॅच भारताने जिंकल्या आहेत. 2018 मध्ये भारताने आयर्लंडचा दौरा केला होता. त्यावेळी दोन सामने खेळले होते. या दोन्ही मॅच मध्ये भारताने विजय मिळवला होता. 27 जून 2019 च्या सामन्यात भारताने आयर्लंडवर 76 धावांनी मोठा विजय मिळवला होता. 29 जूनच्या दुसऱ्या सामन्यातही भारताने विशाल अंतराने विजय मिळवला होता. तो सामना भारताने 143 धावांनी जिंकला होता. त्या आधी 2009 टी 20 वर्ल्ड कप मध्ये दोन्ही संघ आमने-सामने आले होते. त्यावेळी सुद्धा भारतच जिंकला होता. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आठ विकेटने विजय मिळवला होता.

सपोर्ट स्टाफ मध्ये बदल

आयर्लंड सीरीजसाठी टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल झाला आहे. मुख्य कोच राहुल द्रविड यांच्यासह सपोर्ट स्टाफ इंग्लंडमध्ये आहे. म्हणूनच आयर्लंड दौऱ्यासाठी एनसीएचे प्रमुख आणि भारताचे दिग्गज फलंदाज व्हीव्ही एस लक्ष्मण संघासोबत गेले आहेत. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्माही त्यांच्यासोबत आहेत. चेतन शर्मा संघातील खेळाडूंवर लक्ष ठेवतील.