.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला, खरा घाव इथून बसला, पाहा Video

IND vs Pak : भारतीय संघाने वर्ल्डकपमध्ये ७ विकेटने पराभव करत स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने वर्ल्ड कपमध्ये आठवेळा पराभूत केलं आहे.

IND vs PAK : पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला, खरा घाव इथून बसला, पाहा Video
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 14, 2023 | 9:32 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाचा डाव अवघ्या 191 धावांवरच आटोपला. भारताच्या गोलंदाजांनी खतरनाक प्रदर्शन करत पाकिस्तानच्या बत्या गुल केल्या. पाकिस्तान संघाने 30 ते 35 धावांच्या आतमध्ये जवळपास सहा विकेट्स गमावल्या.  एखाद्या पत्त्यांचा बंगला धाडधाड कोसळतो तसा पाकिस्तान संघ ऑल आऊट झाला. मात्र  30 व्या ओव्हरमध्ये पाकिस्तान संघावर खरा घाव बसला.

भारताच्या पाच गोलंदाजांनी दोन-दोन विकेट्स घेतल्या. प्रत्येक गोलंदाजाने कडक प्रदर्शन करत पाकिस्तान संघाला बॅकफूटवर ढकललं. पाकिस्तान संघाच्या दोन विकेट गेल्या होत्या त्यानंतर मैदानात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान होते. दोघांनीही संघाचा डाव सावरला होता पण रोहितने परत एकदा फॉर्ममध्ये नसलेल्या मोहम्मद सिराजला माघारी बोलावलं.

सिराजने पाडला मुख्य ‘बुरूज’

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

बाबर आझम याची विकेट सिराजने मिळवून दिली, या विकेटनंतर पाकिस्तान संघाला खऱ्या अर्थाने सुरूंग लागला. बाबर आझम अर्धशतक करून बाद झाला. बाबरची विकेट गेल्यानंतर कोणत्याही फलंदाजाला जास्त वेळ तग धरता आला नाही. ना कोणतीही मोठी भागीदारी भारताच्या वेगवान गोलंदाजांनी करू दिली नाही. या सामन्यामध्ये भारताने ७ विकेट राखून विजय मिळवत गुणतालिकेमध्ये नंबर एकवर झेप घेतली.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (W), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ

रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

Follow Us
उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः DCM...
DCM Eknath Shinde | उपसभापती पदासाठी धक्कातंत्र वापरल्यानंतर मोठी अपडेट समोर; स्वतः एकनाथ शिंदे दोन वाजता... काय घडणार?
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोर...
Vidhaansabha Protest | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर विरोधकांचा हल्लाबोल; वोट चोर, चंदा चोरच्या घोषणांनी सरकारला घेरलं
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव
सचिन आहिर यांच्यानंतर 'उबाठा'तील सर्वच आमदार... आदित्य ठाकरेंचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?