IND vs SA, 1st ODI: पहिल्या वनडेवर पावसाचे सावट? जाणून घ्या पार्लचा वेदर रिपोर्ट

| Updated on: Jan 19, 2022 | 8:00 AM

कसोटी मालिका गमावल्यानंतर वनडे सीरीज जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. कसोटी मालिकेत भारताला विजयाचा दावेदार मानले जात होते. पण कमी अनुभवी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने शानदार खेळ दाखवत कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली.

IND vs SA, 1st ODI: पहिल्या वनडेवर पावसाचे सावट? जाणून घ्या पार्लचा वेदर रिपोर्ट
Follow us on

डरबन: रोमांचक कसोटी मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आजपासून तीन वनडे सामन्यांची मालिका (India vs South Africa, 1st ODI) खेळवली जाणार आहे. पार्लच्या बोलँड पार्क स्टेडियममध्ये (Paarl ODI) पहिल्या दोन वनडे खेळल्या जाणार आहेत. कसोटी मालिका गमावल्यानंतर वनडे सीरीज जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. कसोटी मालिकेत भारताला विजयाचा दावेदार मानले जात होते. पण कमी अनुभवी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने शानदार खेळ दाखवत कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. वनडे सीरीजआधी पार्लमध्ये वातावरण कसे असेल? (Paarl Weather Report) हा प्रश्न विचारला जातोय. कसोटी सामन्यादरम्यान पावसाने मालिकेत व्यत्यय आणला होता, तसंच पाऊस आताही बोलँड पार्कमध्ये अडथळा आणणार का? अशी शंका अनेकांच्या मनात आहे.

हवामानाची माहिती देणाऱ्या वेबसाइटनुसार चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. बुधवारी पार्लमधील हवामान एकदम स्वच्छ असेल. दिवसभर ऊन असेल व रात्री सुद्धा पाऊस पडणार नाही. पावसाची शक्यता पाच टक्क्यांपेक्षाही कमी आहे. तापमान 34 डीग्री सेल्सिअस असेल. रात्री दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला फटका बसू शकतो. बोलँड मध्ये नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य राहिलं.

पार्लचा पीच रिपोर्ट
पार्लच्या बोलँड पार्क मैदानावर आतापर्यंत भारताने कधीही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मॅच खेळलेली नाही. बोलँडची खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. इथे मोठी धावसंख्या उभारली जाऊ शकते. केएल राहुलच्या मते इथे फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. केएल राहुलने सामन्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अश्विन आणि युजवेंद्र चहल दोघांना खेळवण्याचे संकेत दिलेत.

भारतीय संघ:
केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यजुवेंद्र चहल, आर.अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी

India vs south africa 1st odi paarl weather report boland park pitch squad