India test Captain: कसोटीमध्ये पुढचा कॅप्टन कोण? दिलीप वेंगसरकरांनी निवड समितीला झापलं

वरचे घटक लक्षात घेतले, तर कसोटीमध्ये कोहलीची जागा घेईल असं कुठलं एक नाव निश्चितपणे सांगता येणार नाही. याच मुद्यावर माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी परखड भाष्य केलं.

India test Captain:  कसोटीमध्ये पुढचा कॅप्टन कोण? दिलीप वेंगसरकरांनी निवड समितीला झापलं
Dilip Vengsarkar (Photo: BCCI)
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 7:44 PM

मुंबई: विराट कोहलीने (Virat kohli) कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याच्याजागी नवीन कर्णधार कोण होणार? यावर सध्या चर्चा सुरु आहे. रोहित शर्मा, (Rohit sharma) केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत अशी वेगवेगळी नाव समोर आली आहेत. पण काही निश्चित नाहीय. रोहित सध्या वनडे आणि टी-20 चा कर्णधार आहे. पण तिन्ही फॉर्मेटमध्ये कर्णधारपद भूषवण इतकं सोप नाहीय. त्यात त्याच वय 34 आहे. त्यामुळे कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी त्याचाच विचार होईल, हे खात्रीने सांगता येणार नाही.

केएल राहुलने आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे कर्णधारपद भूषवले होते. उद्यापासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे सीरीजचा तो कॅप्टन आहे. जोहान्सबर्गमध्ये त्याला नेतृत्वाची संधी मिळाली, तेव्हा त्याने काही चुका सुद्धा केल्या होत्या. त्यानंतर भविष्याचा विचार केल्यास, ऋषभ पंतचं एक नाव आहे. आयपीएलमध्ये त्याने दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं. वय देखील त्याच्यासाठी एक जमेची बाजू आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याचा अभाव ही बाब त्याच्याविरोधात जाते.

दिलीप वेंगसरकरांच परखड भाष्य वरचे घटक लक्षात घेतले, तर कसोटीमध्ये कोहलीची जागा घेईल असं कुठलं एक नाव निश्चितपणे सांगता येणार नाही. याच मुद्यावर माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी परखड भाष्य केलं. “सध्याची आणि त्याआधीची निवड समिती कोहलीची जागा घेऊ शकेल, अशा नेतृत्वाला आकार देण्यात अपयशी ठरली” असे वेंगसरकर म्हणाले. ते टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होते.

दूरदृष्टीचा अभाव “भविष्यात कर्णधार घडवण्यासाठी आवश्यक असलेला दूरदृष्टीचा अभाव निवड समितीकडे दिसला. आम्ही धोनीला तयार केलं. पण ते कर्णधारपदी कोहलीची जागा घेऊ शकेल, असा खेळाडू ओळखू शकले नाहीत. मागच्यावर्षी भारताचा संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी शिखर धवनला कर्णधार का बनवलं? ते मला अजून समजलेलं नाही” असं वेंगसरकर म्हणाले.

‘They haven’t identified right man to replace Kohli’ Vengsarkar blames selectors

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.