SA vs IND 3rd T20 | सुर्यकुमार यादव शेवटच्या सामन्यात काढणार हुकमी एक्का, कोण आहे तो मॅचविनर खेळाडू?

SA vs IND 3rd T-20 : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये आज शेवटचा आणि तिसरा टी-20 सामना होणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या प्लेइंगमध्ये बदल होणार असल्याची चर्चा आहे. एक असा हुकमी खेळाडू ज्याला सूर्या आज खेळवणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे.

SA vs IND 3rd T20 | सुर्यकुमार यादव शेवटच्या सामन्यात काढणार हुकमी एक्का, कोण आहे तो मॅचविनर खेळाडू?
Suryakumar Yadav
| Updated on: Dec 14, 2023 | 1:13 PM

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये तिसराआणि अखेरचा टी-20 सामना पार पडणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला नाहीतर आफ्रिका संघ मालिका जिंकणार आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द, दुसऱ्या सामन्यात पराभव आणि आता तिसरा सामना जोहान्सबर्ग येथे होणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी सूर्यकुमार यादव आजच्या प्लेइंग 11  मध्ये एका स्टार खेळाडूला नक्की घेणार आहे. कारण मागील सामन्यामध्ये त्या खेळाडूला न घेतल्याने त्याची कमी पडलेली दिसून आली. हा मॅचविनर खेळाडू कोण आहे जाणून घ्या.

दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये आफ्रिकेच्या फलंदाजांनी इंडियाच्या बॉलर्सचा चांगलाच घाम काढलेला दिसून आला होता. सूर्याने आयसीसी रँकिंगमध्ये एक नंबरला राहिलेल्या खेळाडूला बसवल्याने त्याच्यावर टीका झालेली पाहायला मिळाली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात तो खेळाडू संघात असणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून रवी बिश्नोई आहे. तिसऱ्या टी-20 मध्ये चांगल्या जोरदार कमबॅक करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

टी-20 वर्ल्ड कप आधी टीम इंडियाचे दोन ते तीन सामने बाकी आहेत. त्यामधील दोन सामने हे भारतातच अफगाणिस्तानसोबत होणार आहे. परदेशातील हा शेवटचा सामना असणार आहे त्यामुळे संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. बाकी निवड ही फक्त आयपीलच्या प्रदर्शनावरच होणार आहे.

3 टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (C), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (WK), जितेश शर्मा (WK), रवींद्र जडेजा (VC), वॉशिंग्टन सन , रवी बिश्नोई , कुलदीप यादव , अर्शदीप सिंग , मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.