IND vs SA, 4th 20I : चौथ्या टी 20 मॅचमध्ये कशी असेल Playing-11, उमरान मलिक डेब्यु करणार?

IND vs SA, 4th 20I : दिल्ली (Delhi) आणि कटक मधल्या पराभवानंतर टीम इंडियाने विशाखापट्टनमममध्ये जोरदार पलटवार केला. भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची मालिका सुरु आहे.

IND vs SA, 4th 20I : चौथ्या टी 20 मॅचमध्ये कशी असेल Playing-11, उमरान मलिक डेब्यु करणार?
Rahul Dravid-Umran Malik
Image Credit source: twitter
| Updated on: Jun 16, 2022 | 4:28 PM

मुंबई: दिल्ली (Delhi) आणि कटक मधल्या पराभवानंतर टीम इंडियाने विशाखापट्टनमममध्ये जोरदार पलटवार केला. भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) पाच टी 20 सामन्यांची मालिका सुरु आहे. भारतीय संघ अजूनही 1-2 ने पिछाडीवर आहे. शुक्रवारी राजकोटमध्ये सामना होईल. भारताला या सामन्यातही विजय आवश्यक आहे. भारत काहीही करुन हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. कारण ही मॅच हरली, तर त्यांचे मालिकेतील आव्हान संपुष्टात येईल. विशाखापट्टनम सारखीच इथेही स्थिती आहे. विशाखापट्टनममध्ये ज्या पद्धतीचा खेळ केला, तसाच खेळ टीम इंडियाला (Team India) राजकोट मध्ये दाखवावा लागेल. तिथे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात भारतीय संघाने सरस कामगिरी केली होती. भारतीय संघ कुठल्या प्लेइंग 11 सह मैदानावर उतरणार हा प्रश्न आहे. भारतीय संघ काही बदल करेल का? मागच्या तीन सामन्यात कॅप्टन ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज आवेश खान या भारताच्या दोन कमकुवत बाजू आहेत.

आवेश खानला बाहेर बसवणार?

ऋषभ पंत कॅप्टन आहे. त्यामुळे त्याला बाहेर बसवणं शक्य नाही. पण आवेश खानला बाहेर बसवलं जाऊ शकतं. आवेश खान पहिल्या आणि तिसऱ्या टी 20 सामन्यात महागडा गोलंदाज ठरला. आवेश खानने तीन सामन्यात एकही विकेट घेतलेला नाही. आतापर्यंत सीरीजमध्ये 11 ओव्हर्समध्ये त्याने 87 धावा दिल्या आहेत. म्हणजे प्रति षटक त्याचा इकॉनमी रेट 8 धावा आहे. म्हणून टीम इंडिया आवेश खानला बाहेर बसवेल का? हा प्रश्न निर्माण झालाय.

उमरान मलिकला संधी मिळेल?

वेग हे आवेश खानच्या गोलंदाजीच वैशिष्टय आहे. पण टीम इंडियाकडे आवेश खान पेक्षापण जास्त वेगात बॉलिंग करणारा गोलंदाज उपलब्ध आहे. उमरान मलिकने आयपीएल 2022 मध्ये शानदार प्रदर्शन केलं. त्याने 22 विकेट काढल्या. 157 किमी प्रति तास वेगाने त्याने चेंडू टाकला. या वेगामुळेच उमरान मलिकसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले गेले. टीम इंडिया या वेगवान गोलंदाजाला डेब्युची संधी देईल का? हा आता प्रश्न आहे. फॉर्म आणि फिटनेस उमरान मलिककडे आहे. आत्मविश्वासाची सुद्धा कमतरता नाहीय.

अशी असू शकते टीम इंडियाची संभाव्य Playing 11

ऋषभ पंत (कॅप्टन), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, उमरान मलिक, युजवेंद्र चहल,