AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: चहलच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेला लोळवलं, दिग्गज गोलंदाजाने सांगितलं 3 षटकात कशी पलटवली बाजी

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) पहिल्या दोन सामन्यात युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आपल्या गोलंदाजीने प्रभावित करु शकला नव्हता.

IND vs SA: चहलच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिकेला लोळवलं, दिग्गज गोलंदाजाने सांगितलं 3 षटकात कशी पलटवली बाजी
Yuzi Chahal Image Credit source: AFP
| Updated on: Jun 15, 2022 | 6:10 PM
Share

मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (IND vs SA) पहिल्या दोन सामन्यात युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आपल्या गोलंदाजीने प्रभावित करु शकला नव्हता. त्याला विकेटही काढता आल्या नव्हत्या आणि धाव गतीलाही लगाम घालता आला नव्हता. या दोन सामन्यातील कसर चहलने विशाखापट्टनमच्या सामन्यात भरुन काढली. चहलने तिसऱ्या टी 20 सामन्यात (3rd 20 Match) आपल्या चार षटकात पाचच्या इकोनॉमी रेटने गोलंदाजी केली. त्याने 20 धावात तीन विकेट काढल्या व टीम इंडियाला सीरीजमधील पहिला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या शानदार प्रदर्शनासाठी त्याची प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

आशिष नेहरा म्हणाला…

चहलची गोलंदाजी पाहून भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि गुजरात टायटन्सचा कोच आशिष नेहरा म्हणाला की, “आज चहलची आक्रमकता पहायला मिळाली, ज्याच्यासाठी तो ओळखला जातो. त्याने आज आपली लेंथ आणि पेसचं खूप चांगल्या पद्धतीने मिश्रण केलं. मागच्या सामन्यानंतर चहलने नक्कीच विचार केला असेल, तो डिफेन्सिव होता. त्याने आपल्या फ्लाइट चेंडूनी फलंदाजांना सतावल व फसवलं. आपल्या पहिल्या तीन षटकातच त्याने विजय दक्षिण आफ्रिकेपासून दूर नेलं”

मॅच विनर्सनाच पॅव्हेलियनमध्ये पाठवलं

युजवेंद्र चहलने 20 धावा देऊन तीन विकेट काढल्या, ज्याने विजयाचा पाया रचला. चहलने सर्वाताआधी ऑलराऊंडर ड्वेन प्रिटोरियसला आऊट केलं. त्याने फक्त 20 धावा केल्या. त्यानंतर दिल्ली सामन्यातील हिरो रासी वॅन डार डुसेला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर त्याने मागच्या सामन्यात तुफानी फलंदाजी करणाऱ्या हेनरिक क्लासनला (29) आऊट केलं.

पहिल्या दोन सामन्यात जलवा दिसला नाही

याआधी खेळलेल्या गेलेल्या दोन सामन्यात चहलने निराशाजनक प्रदर्शन केलं होतं. त्याच्या गोलंदाजीत ते कौशल्य दिसलं नव्हतं, ज्याच्यासाठी चहल ओळखला जातो. पहिल्या सामन्यात त्याला पूर्ण चार षटकही गोलंदाजी करता आली नाही. त्याने 2.1 षटकात 26 धावा दिल्या होत्या. कटक मध्ये त्याला चार षटकांचा कोटा पूर्ण करता आला. पण तो महागडा ठरला होता. त्याने चार ओव्हर्समध्ये 49 धावा दिल्या पण एकही विकेट काढली नाही.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.