AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : ऋषभच्या नेतृत्वाखाली भारताचा पहिला विजय, ‘हे’ टीम इंडियाच्या विजयाचे 5 हिरो

किशनने या मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावले.पहिल्या T20 सामन्यातही त्यानं अर्धशतक झळकावलं होतं.

IND vs SA : ऋषभच्या नेतृत्वाखाली भारताचा पहिला विजय, 'हे' टीम इंडियाच्या विजयाचे 5 हिरो
IND vs SAImage Credit source: social
| Updated on: Jun 15, 2022 | 8:55 AM
Share

नवी दिल्ली :  कोणताही क्रिकेट सामना असो संघातील असे काही चमकदार खेळाडू असतात. ते सामन्याची दिशाच बदलू शकतात. असंच काहीसं काल पहायला मिळालं. भारतीय क्रिकेट संघाने (IND) तिसऱ्या T-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (SA) 48 धावांनी पराभव करून पाच सामन्यांच्या T20 मालिकेत आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या सामन्यात फलंदाजांपाठोपाठ गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी केली. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतानं पाच विकेट्सवर 179 धावा केल्या आणि त्यानंतर आफ्रिकन संघाला 19.1 षटकांत 131 धावांत गुंडाळले. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा हा पहिला विजय आहे. या वर्षातील कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा (IND vs SA) हा पहिला विजय आहे. या विजयानंतर भारतानं मालिका जिंकण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पराभवानंतरही दक्षिण आफ्रिका मालिकेत 2-1 ने पुढे आहे. टीम इंडियाच्या या महत्त्वाच्या विजयात हे 5 खेळाडू हिरो बनून पुढे आले. या सामन्यातील त्याच्या कामगिरीवर एक नजर टाकूया.

  1. ऋतुराज गायकवाड : खराब फॉर्मशी झगडत असलेल्या गायकवाडनं योग्यवेळी येऊन संघाला ताकद दिली. त्यानं इशान किशनसोबत पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. गायकवाडनं 35 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकत आपले पहिलं आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकलं. गायकवाडने इशान किशनसोबत केलेली भागीदारी अखेरीस निर्णायक ठरली.
  2. इशान किशन : किशनने या मालिकेतील दुसरे अर्धशतक झळकावले.पहिल्या T20 सामन्यातही त्यानं अर्धशतक झळकावलं होतं. तिसऱ्या सामन्यात इशाननं 35 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 54 धावांची खेळी केली. त्यानं ऋतुराज गायकवाडसोबत पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. किशनन चौथं अर्धशतक केलंय. किशनच्या या भागीदारी अखेरीस निर्णायक ठरल्या.
  3. हर्षल पटेल : 180 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं नियमित अंतरानं विकेट गमावल्या.यात हर्षल पटेलचा मोलाचा वाटा होता. त्यानं मधल्या षटकांमध्ये लागोपाठ विकेट घेत आफ्रिकन फलंदाजांचे कंबरडे मोडलं. हर्षलनं अवघ्या 25 धावांत चार बळी घेतले.
  4. युझवेंद्र चहल : गेल्या काही सामन्यांपासून फॉर्मात नसलेल्या युझवेंद्र चहलनेही या सामन्यात तीन विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला.चहलनं चार षटकांत 20 धावा देत तीन बळी घेत फलंदाजांवर एकीकडून दडपण ठेवलं. युझवेंद्र चहलला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. या मालिकेत पहिल्यांदाच फिरकीपटूंनी एका डावात 2 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या. त्याचवेळी डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने 4 षटकात 28 धावा देत 1 बळी घेतला.त्याने संघाला सामन्यातील पहिले यश मिळवून दिले.
  5. हार्दिक पांड्या : पांड्या गोलंदाजी करण्यासाठी आला नाही. फलंदाजीत त्याने संघासाठी उपयुक्त खेळी खेळली. शेवटच्या षटकात तुफानी खेळी खेळणाऱ्या पंड्याने अवघ्या 21 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 31 धावांची नाबाद खेळी केली.त्याची ही खेळी अखेरीस भारतासाठी महत्त्वाची ठरली.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.