AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: ‘तोंड नको, बॅट चालवं, नाही तर…’ ऋषभ पंतला सुनावलं

दुसऱ्या कसोटीत पंतची बॅट चालली नाही पण तोंड भरपूर चाललं. त्याने यष्टीपाठी राहून दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज वॅन डर डुसेंला भरपूर त्रास दिला. सतत यष्टीपाठून त्याची बडबड सुरु होती.

IND vs SA: 'तोंड नको, बॅट चालवं, नाही तर...'  ऋषभ पंतला सुनावलं
(AFP Photo)
| Edited By: | Updated on: Jan 08, 2022 | 7:30 AM
Share

जोहान्सबर्ग: भारताचा युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतवर (Rishabh Pant) सध्या चहूबाजूंनी टीका सुरु आहे. याचं कारण आहे त्याची फलंदाजी. मागच्या काही सामन्यात ऋषभच्या बॅटमधून धावा निघालेल्या नाहीत. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्याडावात ऋषभ ज्या पद्धतीने बाद झाला, त्यामुळे टीकाकारांना त्याला लक्ष्य करण्याची आयती संधी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकन खेळाडूंबरोबर वाद झाल्यामुळे रागाच्या भरात चुकीचा फटका खेळून ऋषभ बाद झाला होता. “ऋषभला धावा करण्याची गरज आहे, नाही तर तो संघाबाहेर जाऊ शकतो” असं दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलने (Morne Morkel) म्हटलं आहे. (india vs south africa morne morkle says rishabh pant needs to score run rather than talking)

दुसऱ्या कसोटीत पंतची बॅट चालली नाही पण तोंड भरपूर चाललं. त्याने यष्टीपाठी राहून दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज वॅन डर डुसेंला भरपूर त्रास दिला. सतत यष्टीपाठून त्याची बडबड सुरु होती. मैदानावर स्लेजिग होते, पण मैदानावर पंत धावा करत नाहीय, याकडे मॉर्नी मॉर्केलने लक्ष वेधलं.

यष्टीपाठी राहून तो सतत बडबड करतोय यामुळे तो स्वत:च्या अडचणी वाढवून घेईल. ‘पंतने तोंडाऐवजी बॅटने बोलणं जास्त गरजेचं आहे’ असे मॉर्केलने सांगितलं. जोहान्सबर्गच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने 17 धावा केल्या तर दुसऱ्या डावात खातही उघडू शकला नाही. पहिल्या कसोटीत पहिल्या डावात त्याने आठ धावा आणि दुसऱ्या डावात 34 धावा केल्या होत्या.

बॅटने बोलं “माझ्या दृष्टीने ऋषभ पंत एक चांगला खेळाडू आहे. पण यावेळी मी त्याच्याजागी असतो, तर स्टंम्पच्या पाठून बोलण्याऐवजी बॅटने बोलणं जास्त पसंत केल असतं. त्याने कमी धावा केल्या तर त्याच्या अडचणी वाढू शकतात” असे मॉर्कलने म्हटलं आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.