Rahul Dravid: विराट, अजिंक्य, पुजाराच्या बॅटमधून धाव कधी निघणार? राहुल द्रविड म्हणाले….

| Updated on: Jan 02, 2022 | 5:39 PM

"करीअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर खेळाडूंबरोबर असं होतं. प्रत्येकाबरोबर असं होतं. तुम्हाला वाटतं, तुम्ही चांगली फलंदाजी करताय पण मोठी धावसंख्या होत नाही"

Rahul Dravid: विराट, अजिंक्य, पुजाराच्या बॅटमधून धाव कधी निघणार? राहुल द्रविड म्हणाले....
Virat Kohli
Follow us on

जोहान्सबर्ग: सध्या खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहली, (Virat Kohli) चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) हेड कोच राहुल द्रविड यांनी पाठराखण केली आहे. फक्त वेळेचा प्रश्न आहे, ते मोठी धावसंख्या उभारतील, असा विश्वास राहुल द्रविड यांनी व्यक्त केला. भारताची मधली फळी संघ व्यवस्थापनासाठी चिंतेचा विषय आहे. कर्णधार विराट कोहली, माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या फलंदाजांना अद्यापी सूर गवसलेला नाही. सेंच्युरियन कसोटी जिंकली असली, तरी पुजाराने 0 आणि 16, कोहलीने 35 आणि 18, रहाणेने 48 आणि 20 धावा केल्या होत्या. तिघांच्या खराब फॉर्ममुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. (India vs South Africa second Johannesburg Test When Virat Kohli Pujara and Rahane will score good runs head coach Rahul Dravid Answers)

काळजी शब्द मला योग्य वाटत नाही

“करीअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर खेळाडूंबरोबर असं होतं. प्रत्येकाबरोबर असं होतं. तुम्हाला वाटतं, तुम्ही चांगली फलंदाजी करताय पण मोठी धावसंख्या होत नाही. या तिघांबरोबर सध्या असचं घडतय” असं राहुल द्रविड रविवारच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. “एक चांगली गोष्ट आहे, ते चांगले टचमध्ये दिसतायत. चांगल्या सुरुवातीला मोठ्या खेळीमध्ये कसं बदलायचं, हे त्यांना माहित आहे. काळजी हा शब्द मला योग्य वाटत नाही. जेवढं शक्य आहे, तेवढं ते चांगल करतायत” असं राहुल द्रविड यांनी सांगितलं.

पुजाराची चिंता वाटते का?
भारत विजयी संघामध्ये बदल करणार? पुजाराला ड्रॉप करुन दुसऱ्याला संधी देणार? त्यावर द्रविड म्हणाले की, चिंतेचा विषय नाहीय. या वातावरणाशी जुळवून घेणं, इतकं सोप नाहीय. पण तुमच्या पहिल्या तीन-चार फलंदाजांपैकी एक सेट होईल आणि त्याच्याकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा तुम्ही करु शकता. पुजारा हे करु शकतो, हे आपल्याला माहित आहे, असे द्रविड म्हणाले.

संबंधित बातम्या: 

Sulli Deal : ‘सुल्ली डील’ प्रकरणाची गृहमंत्र्यांकडून तात्काळ दखल, वळसे-पाटलांचे कठोर कारवाईचे आदेश
Nawab Malik : नवाब मलिकांचा एनसीबीवर पुन्हा गंभीर आरोप, अधिकारी आणि पंचांमधील कथित ऑडिओ क्लिपही जाहीर
‘केंद्रात लॉबिंग करुन पोस्टिंग करायला ही महाभकास आघाडी आहे का’ अतुल भातखळकरांचा मलिकांना खोचक प्रत्युत्तर

(India vs South Africa second Johannesburg Test When Virat Kohli Pujara and Rahane will score good runs head coach Rahul Dravid Answers)