AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sa vs Ind 2nd Test : आफ्रिकेच्या 11 पैकी एका खेळाडूची टीम इंडियाला होती दहशत, रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितलं नाव

Rohit Sharma on Second Test : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने सामना जिंकला असला तरी आफ्रिकेच्या एका खेळाडूची भीती असल्याचं सांगितलं.

Sa vs Ind 2nd Test : आफ्रिकेच्या 11 पैकी एका खेळाडूची टीम इंडियाला होती दहशत, रोहित शर्माने सामन्यानंतर सांगितलं नाव
ind vs sa test rohit sharmaImage Credit source: PTI
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jan 04, 2024 | 8:17 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सात विकेटने विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी केलेल्या घातक गोलंदाजीसमोर आफ्रिका संघाने  शरणागती पत्करली. यजमान संघाला त्यांच्याच होम ग्राऊंडमध्ये पराभूत करत टीम इंडियाने मोठा इतिहास रचला आहे. पहिल्या कसोटीमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं. या सामन्यातील विजयानंतर रोहित शर्मा याने आफ्रिकेच्या एका खेळाडूला लवकरात लवकर आऊट करण्याचा प्लॅन असल्याचं सांगितलं आहे.

कोण आहे तो खेळाडू?

रोहित शर्मा याने सामना संपल्यावर बोलताना, गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये आम्ही भारताबाहेर मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलो होतो. मालिका जिंकली असती तर आणखी आनंद झाला असता पण आपण सर्व काही मिळवू शकत नाही. साऊथ आफ्रिका तगडा संघ असून नेहमीच तुम्हाला आव्हान देतो. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये डीन एल्गर याची विकेट लवकरात लवकर घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. आफ्रिकेसाठी एल्गरने केलेली कामगिरी खूप कमी जणांना जमली आहे. क्वचितच असे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

डीन एल्गर याने पहिल्या कसोटी सामन्यामध्ये 185 धावांची खेळी केली होती. या खेळीसह एल्गने विजयाचा पाया आफ्रिका संघाला रचून दिला होता. दुसऱ्या सामन्यात टेम्बा बावुमा नसल्याने एल्गरकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली होती. मात्र त्याला आपल्या नेतृत्त्वात संघाला विजय मिळवून देता आला नाही.

डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी

रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार

Follow Us
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट