IND vs SA Super 8 T20 WC Score Updates : भारताचा मानहानीकारक पराभव, 76 धावांनी दक्षिण अफ्रिकेने लोळवलं
India vs South Africa, T20 world Cup 2026 Highlight and Score Updates In Marathi: टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ साखळी फेरीत अजिंक्य होते. पण सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकन संघ भारतावर भारी पडला. दक्षिण अफ्रिकेने भारताला 76 धावांनी लोळवलं.

आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत दक्षिण अफ्रिकेने भारताचा दारूण पराभव केला. भारतासमोर विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारतीय संघ 111 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताने हा सामना 76 धावांनी गमवला असून उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं आहे. आता भारताला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकणं भाग आहे. 1200 दिवसांनंतर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. या स्पर्धेत भारताचा मागचा पराभव 10 नोव्हेंबर रोजी 2022 झाला होता. 2022 टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध झाला होता. त्यानंतर भारताने सलग 12 सामने जिंकले, तर एक अनिर्णीत राहिला.
LIVE Cricket Score & Updates
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : भारताचा 76 धावांनी दारूण पराभव
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताच्या पदरी निराशा पडली आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने भारताला 76 धावांनी पराभवाची धूळ चारली. भारतासमोर विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं होतं. पण भारतीय संघ 111 धावाच करू शकला. यामुळे भारताचं नेट रनरेट खराब झाला आहे.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : शिवम दुबे 42 धावा करून बाद
शिवम दुबे 37 चेंडूत 42 धावा करून बाद झाला आहे. त्याने एकाकी झुंज दिली. पण फार काही करू शकला नाही. अखेर भारताचा पराभव निश्चित झाला आहे.
-
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : व्वा महाराज व्हा, टीम इंडियाला एकाच ओव्हरमध्ये 3 झटके
केशव महाराज याने टीम इंडियाला आपल्या एकाच ओव्हरमध्ये 3 मोठे झटके देत बॅकफुटवर ढकललं आहे. केशवने आधी हार्दिक पंड्या याला आऊट केलं. त्यानंतर रिंकू सिंह मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला. रिंकू यासह गोल्डन डक ठरला. त्यानंतर अर्शदीप सिंह आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 15 ओव्हरमध्ये 8 आऊट 88 असा झाला आहे.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : दक्षिण आफ्रिकेची सामन्यावर घट्ट पकड, शिवम-हार्दिक गेम बदलणार?
दक्षिण आफ्रिकेने 188 धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला सुरुवातीपासून ठराविक अंतराने झटके देत बॅकफुटवर ढकललं आहे. टीम इंडियाने ओव्हरध्ये 81 धावा केल्या आहेत. भारताला 42 बॉलमध्ये 107 धावांची गरज आहे. तर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे ही जोडी मैदानात आहे. त्यामुळे ही जोडी कमाल करणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : कॅप्टन सूर्यकुमार यादव आऊट, टीम इंडियाला पाचवा झटका
टीम इंडियाची पडझड सुरुच आहे. दक्षिण आफ्रिकेने भारताला पाचवा झटका दिला आहे. कॉर्बिन बॉश याने कर्णधार सूर्यकुमार यादव याला 10 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर डेवाल्ड ब्रेव्हीस याच्या हाती झेलबाद केलं. सूर्याने 22 बॉलमध्ये 18 रन्स केल्या.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : वॉशिंग्टन सुंदर आऊट, टीम इंडियाला चौथा झटका
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला चौथा झटका दिला आहे. कॉर्बिन बॉश याने वॉशिंग्टन सुंदर याला विकेटकीपर क्विंटन डी कॉक याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. सुंदरने 11 धावा केल्या.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : अभिषेक शर्मा आऊट, भारताला तिसरा झटका, सूर्यासेना अडचणीत
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला तिसरा झटका दिला आहे. इशान किशन, तिलक वर्मा याच्यानंतर अभिषेक शर्मा आऊट झाला आहे. अभिषेकने 15 धावा केल्या. अभिषेक आऊट झाल्याने टीम इंडियाची स्थिती 4.3 ओव्हरमध्ये 3 आऊट 26 अशी झाली आहे.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : काय लावलंय हे, इशाननंतर तिलक वर्मा आऊट, भारताला दुसरा धक्का
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा मोठा झटका दिला आहे. इशान किशन पहिल्याच ओव्हरमध्ये डक आऊट झाला. त्यानंतर मार्को यान्सेन याने टीम इंडियाला दुसऱ्या ओव्हरमध्ये झटका दिला. यान्सेन याने तिलक वर्मा याला विकेटकीपर क्विंटन डी कॉक याच्या हाती 1 रनवर कॅच आऊट केलं.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : टीम इंडियाची सुमार सुरुवात, इशान किशन डक
टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. दक्षिण आफ्रेिकने 188 धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला पहिला झटका दिला आहे. कॅप्टन एडन मार्करम याला झिरोवर आऊट केलं. त्यामुळे टीम इंडियाचं धावांचं खातं उघडण्याआधी विकेटचं खातं उघडलं आहे. इशान आऊट झाल्यानंतर अभिषेक शर्माची साथ देण्यासाठी तिलक वर्मा मैदानात आला आहे.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : टीम इंडियासमोर 188 धावांचं लक्ष्य
दक्षिण अफ्रिकेने टीम इंडियासमोर 188 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. दक्षिण अफ्रिकेने 20 षटकात 7 गडी गमवून 187 धावा केल्या. शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याने 20 धावा दिल्या. आतापर्यंत टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने इतकं मोठं लक्ष्य गाठलेलं नाही. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींचं टेन्शन वाढलं आहे.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : बुमराहकडून तिसरी शिकार, कॉर्बिन बॉश आऊट
जसप्रीत बुमराह याने तिसरी विकेट मिळवली आहे. बुमराहच्या बॉलवर कॉर्बिन बॉश हिट विकेट आऊट झाला. बॉशने 5 धावा केल्या.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : जबरदस्त, टीम इंडियाचं कमबॅक, दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका
अर्शदीप सिंह याने मार्को यान्सेन याला रिंकू सिंह याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. यान्सेनने 6 बॉलमध्ये 2 धावा केल्या. यान्सेनच्या रुपात दक्षिण आफ्रिकेली सहावी विकेट गमावली.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : झाला आऊट एकदाचा, टीम इंडियाला मोठी विकेट, डेव्हीड मिलर आऊट
वरुण चक्रवर्ती याने टीम इंडियाची मोठी डोकेदुखी दूर केली आहे. वरुण चक्रवर्ती याने सेट आणि धोकादायक डेव्हीड मिलर याला आऊट केलं आहे. वरुणने मिलरला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. मिलरने 35 बॉलमध्ये 63 रन्स केल्या.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : डेव्हीड मिलरची फटकेबाजी सुरु, टीम इंडियाला विकेट हवी
दक्षिण आफ्रिकेने 14 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 134 धावा केल्या आहेत. डेव्हिड मिलर 57 आणि ट्रिस्टन स्टब्स 5 धावांवर नाबाद खेळत आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिका उर्वरित 36 बॉलमध्ये किती धावा करणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : शिवम दुबेने मिलर-ब्रेव्हीस जोडी फोडली, दक्षिण आफ्रिकेला चौथा झटका
ऑलराउंडर शिवम दुबे याने टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत असलेली मिलर-ब्रेव्हीस जोडी फोडली आहे. शिवमने डेवाल्ड ब्रेव्हीस याला अभिषेक शर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. डेवाल्डने 29 बॉलमध्ये 45 रन्स केल्या.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : मिलर-ब्रेव्हीस जोडी जमली, टीम इंडिया विरुद्ध फटकेबाजी
डेव्हीड मिलर आणि डेवाल्ड ब्रेव्हीस या जोडीने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेची 3 आऊट 20 अशी स्थिती केली होती. मात्र डेव्हीड मिलर आणि डेवाल्ड ब्रेव्हीस या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 30 बॉलमध्ये अर्धशतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे या जोडीला लवकरात लवकर फोडण्याची गरज आहे.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : भारताची कडक सुरुवात, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जबरदस्त बॉलिंग
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अप्रतिम सुरुवात केली आहे. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला पावर प्लेमध्ये 3 झटके दिले आहेत. जसप्रीत बुमराह याने क्विंटन डी कॉक आणि रायन रिकेल्टन या दोघांना आऊट केलं. तर अर्शदीप सिंह याने कॅप्टन एडन मार्करम याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. भारताने दक्षिण आफ्रिकेला रायनच्या रुपात तिसरा झटका दिला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 4 ओव्हरमध्ये 3 आऊट 20 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर डेवाल्ड ब्रेव्हीस आणि डेव्हीड मिलर या जोडीने दक्षिण आफ्रिकेला सावरलं. दक्षिण आफ्रिकेने 8 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 56 धावा केल्या आहेत. ब्रेव्हीस 12 आणि मिलर 25 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : बुमराहचा धमाका, दक्षिण आफ्रिकेला तिसरा झटका, रायन रिकेल्टन आऊट
जसप्रीत बुमराह याने रायन रिकेल्टन याला आऊट करत दुसरी विकेट मिळवली. टीम इंडियाने यासह दक्षिण आफ्रिकेला तिसरा झटका दिला. बुमराहने रायन रिकेल्टन याला 7 धावांवर शिवम दुबे याच्या हाती कॅच आऊट केलं.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : अर्शदीपचा धमाका, दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनची शिकार, एडन मार्करम आऊट
जसप्रीत बुमराह याच्यानंतर अर्शदीप सिंह याने आपली पहिली विकेट मिळवून दक्षिण आफ्रिकेला दुसरा आणि मोठा झटका दिला आहे. अर्शदीपने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याला 4 रन्सवर हार्दिक पंड्या याच्या हाती कॅच आऊट केलं आहे. अर्शदीपची एडनला आऊट करण्याची ही सातवी वेळ ठरली आहे.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : क्विंटन डी कॉक बोल्ड, बुमराहकडून दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 10 धावांवर पहिला झटका दिला आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने क्विंटन डी कॉक याला बोल्ड केलं आहे. डी कॉकने 6 धावा केल्या.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Score Updates : एडन मार्करम आणि क्विंटन डी कॉक जोडी मैदानात
दक्षिण अफ्रिकेकडून एडन मार्करम आणि क्विंटन डी कॉक जोडी मैदानात उतरली आहे. पावर प्लेमध्ये किती धावा करतात याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष आहे. तर भारतीय गोलंदाजी किती विकेट काढणार? आणि दबाव टाकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : दक्षिण अफ्रिकेची प्लेइंग 11
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : भारताची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती -
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : सूर्यकुमार यादव म्हणाला की…
सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्हीही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो, सर्वांना येऊन आमच्याकडे काय आहे ते दाखवण्याची ही चांगली संधी आहे. आमच्याकडे मैदानावर चांगली ऊर्जा आहे आणि आमच्याकडे जे काही येईल ते आम्ही स्वीकारू. प्रथम गोलंदाजी करण्यास आनंद झाला. अक्षर पटेलवर खूप कठोर, आम्ही त्याच संघासह जात आहोत. त्यामुळे कोणतेही बदल नाहीत.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : कर्णधार एडन मार्करम म्हणाला की..
दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत, खरोखरच चांगली खेळपट्टी आहे आणि आम्ही पाहिलेल्यापेक्षा खूपच कोरडी आहे. मुले चांगल्या स्थितीत दिसत आहेत आणि सध्या ही चांगली जागा आहे. आम्हाला येथे काही सामने खेळण्याचे भाग्य लाभले आहे, ही काळ्या मातीची खेळपट्टी आहे. आम्ही मागील सामन्यापेक्षा 4 बदल केले आहेत. केश, लुंगी आणि मार्को परत आले आहेत.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने, प्रथम फलंदाजी निवडली
नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धावांचा पाठलाग करून विजय मिळवण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असेल.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेवर वरचढ
टीम इंडिया टी 20i क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वरचढ असल्याचं स्पष्ट आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 35 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने याने 35 पैकी 21 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने 13 सामने जिंकले आहेत. तर उभयसंघातील 1 सामन्याचा निकाल लागला नाही.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : टी 20i वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिका टीम
एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हीस, ट्रिस्टन स्टब्स, जेसन स्मिथ, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया, क्वेना माफाका, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, केशव महाराज आणि मार्को जॅन्सन.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडिया
अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, संजू सॅमसन, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज.
-
IND vs SA Super 8 T20 WC Live Updates : टीम इंडिया सुपर 8 साठी सज्ज, दक्षिण आफ्रिकेला रोखणार?
टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात साखळी फेरीतील सलग 4 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडिया सुपर 8 फेरीतही विजयी सलामी देत सलग पाचवा सामना जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.