IND vs SA | दक्षिण आफ्रिकेत चूक सगळ्या टीम इंडियाची पण शिक्षा फक्त या 2 खेळाडूंना मिळणार का?

IND vs SA | एक्शनला रिएक्शन असते. सेंच्युरियन कसोटीत जे झालं, त्याचा परिणाम टीम इंडियात पहायला मिळणार. केप टाऊन कसोटीत प्लेइंग इलेव्हन चेंज झालेली दिसू शकते. टीम इंडियाच्या दोन खेळाडूंना किंमत चुकवावी लागेल. सेंच्युरियनमधल्या पराभवाला फक्त हे दोन प्लेयर जबाबदार नाहीयत.

IND vs SA | दक्षिण आफ्रिकेत चूक सगळ्या टीम इंडियाची पण शिक्षा फक्त या 2 खेळाडूंना मिळणार का?
Team india
Image Credit source: icc
| Updated on: Dec 30, 2023 | 8:24 AM

IND vs SA | पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने डावाने टीम इंडियावर दणदणीत विजय मिळवला. अशा सुमार प्रदर्शनानंतर टीम इंडियाच्या पराभवाला जबाबदार कोण? हा प्रश्न निर्माण होण स्वाभाविक आहे. चूक कोणाची? शिक्षा कोणाला मिळणार? हा प्रश्नच नाहीय. कारण दक्षिण आफ्रिकेत जी चूक झालीय, त्याला फक्त एक-दोन खेळाडूच नाही, तर सगळी टीम जबाबदार आहे. आता सगळेच जबाबदार असतील, तर शिक्षा सगळ्यांना झाली पाहिजे. पण असं होणार नाहीय. चूक सगळ्या टीमची आहे पण शिक्षा फक्त 2 खेळाडूंना होऊ शकते. खापर दोन खेळाडूंवर फुटणार. हे दोन प्लेयर कोण आहेत? तेच दोघे बळीचा बकरा बनणार का?

सर्वप्रथम हे समजून घ्या दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाची काय चूक झाली?. सेंच्युरियन कसोटीत टीम इंडियाचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला. फलंदाज असो किंवा गोलंदाज टीमचा प्रत्येक खेळाडू यासाठी जबाबदार आहे. पण पुढच्या कसोटी सामन्यात फक्त 2 खेळाडूंना याची किंमत चुकवावी लागू शकते.

या 2 प्लेयरवर फुटणार खापर

आता प्रश्न हा आहे की, ते दोन भारतीय खेळाडू कोण असणार. सेंच्युरियन कसोटीच्या पराभवाची किंमत त्यांना चुकवावी लागू शकते. या दोन खेळाडूंमध्ये एक अश्विन आणि दुसरा प्रसिद्ध कृष्णा असू शकतो. या दोन खेळाडूंची कामगिरी समाधानाकारक नव्हतीच. त्याशिवाय पुढच्या कसोटीत त्या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, जे दुखापतीमुळे पहिल्या टेस्टमध्ये खेळू शकले नव्हते.

त्यांच्याजागी कुठले दोन प्लेयर टीममध्ये येणार?

अश्विनने दोन्ही डावात मिळून फक्त 8 धावा केल्या. त्याशिवाय फक्त 1 विकेट घेतला. प्रसिद्ध कृष्णाबद्दल बोलायच झाल्यास वेगवान गोलंदाजांना अनुकूल पीचवर डेब्यु करताना 1 विकेट घेतला. केपटाऊनमध्ये दोघांना संधी नाकारली जाऊ शकते. अश्विनच्या जागी रवींद्र जाडेजा आणि प्रसिद्ध कृष्णाच्या जागी मुकेश कुमारला संधी मिळू शकते. जाडेजा पाठदुखीमुळे सेंच्युरियन कसोटीत खेळू शकला नव्हता.

सेंच्युरियन कसोटीत फक्त अश्विन आणि प्रसिद्धची कामगिरी खराब आहे, असं नाहीय. स्वत: कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यरही दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांसमोर असहाय्य दिसले. पण किंमत फक्त अश्विन आणि प्रसिद्धला चुकवावी लागू शकते.