AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, जवळच्या माणसानं ऐनवेळी सोडली साथ, भाजपात मोठा पक्षप्रवेश

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला आहे, भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असून, आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, जवळच्या माणसानं ऐनवेळी सोडली साथ, भाजपात मोठा पक्षप्रवेश
उद्धव ठाकरेंना धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 20, 2025 | 3:37 PM
Share

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आल्याचं पहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून, सर्वपक्षीय मातब्बर नेत्यांनी  भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. भाजपमध्ये झालेल्या या पक्षप्रवेशाचा शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. संजोग वाघेरे हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजोग वाघेरे यांचा भाजप प्रवेश हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. पुण्यातील बारामती गेस्ट हाऊसमध्ये  हा पक्षप्रवेश पार पडला होता, त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने शहरात मोठा पक्षप्रवेश घडवून आणला आहे. सर्वपक्षीय 22 नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. हा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

महापालिकेची निवडणूक आचारसंहिता सुरू झाली आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी  मतमोजणी होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार आहेत. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेले पदाधिकारी

१) माजी महापौर उबाठा गटाचे नेते – श्री संजोगजी वाघेरे पाटील २) माजी अध्यक्ष, स्थायी समिती – सौ. उषाताई वाघेरे ३) राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष – श्री प्रशांत शितोळे ४) राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते – श्री विनोद नढे ५) राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर – श्री प्रभाकर वाघेरे ६) माजी उपमहापौर – श्री राजू मिसाळ ७) उबाठा गटाचे नगरसेवक – श्री अमित गावडे ८) उबाठा गटाच्या नगरसेविका – सौ. मीनलताई यादव ९) श्री रवी लांडगे १०) माजी नगरसेवक – श्री संजय नाना काटे ११) राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका – सौ. आशाताई सूर्यवंशी १२)  प्रविण भालेकर १३)  जालिंदर बापु शिंदे १४)  सचिन सानप १५)  दादा सुखदेव नरळे १६)  सदगुरु कदम १७) समीर मासुळकर १८)  सुहास कांबळे १९)  कुशाग्र कदम २०)  अशोक मगर २१)  नागेश गवळी २२) प्रसाद शेट्टी – माजी नगरसेवक. २३)  नवनाथ जगताप – माजी स्थायी समिती अध्यक्ष. २४) प्रभाकर वाघेरे – माजी उपमहापौर

राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.