IND vs SL 2nd T20: गोलंदाजांच्या मोठ्या चुकांवर हेड कोच Rahul Dravid यांची पहिली प्रतिक्रिया

IND vs SL 2nd T20: शांत-संयमी स्वभाव राहुल द्रविड यांची ओळख आहे. गोलंदाजांच्या या कामगिरीवर, ते म्हणाले की....

IND vs SL 2nd T20: गोलंदाजांच्या मोठ्या चुकांवर हेड कोच Rahul Dravid यांची पहिली प्रतिक्रिया
Rahul Dravid-Hardik pandya
Image Credit source: Getty
| Updated on: Jan 06, 2023 | 11:10 AM

पुणे: भारतीय गोलंदाजांनी केलेल्या चुकांवरुन सध्या गदारोळ सुरु आहे. याच चुकांची चर्चा सुरु आहे. श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाच्या बॉलर्सनी एक-दोन नव्हे, तर तब्बल 7 नो बॉल टाकले. एकच चूक वारंवार केली. बॉलर्सच्या या चुकांवर आता हेड कोच राहुल द्रविड यांनी वक्तव्य केलय. पुण्यात भारत-श्रीलंकेमध्ये दुसरी टी 20 सामना झाला. या मॅचमध्ये भारतीय बॉलर्सनी 7 नोबॉल टाकले. यात 5 नो बॉल एकट्या अर्शदीप सिंहने टाकले. त्यावरुन गदारोळ सुरु आहे.

हा, तर क्राइम

हार्दिक पंड्याने इतके नो बॉल टाकणं हा क्राइम असल्याचं म्हटलय. सुनील गावस्कर यांनी सुद्धा टीमवर टीका केलीय. नो बॉलवरुन सुरु असलेल्या या गदारोळात हेड कोच राहुल द्रविड यांनी गोलंदाजांच समर्थन केलय. कुठल्याही गोलंदाजाला अतिरिक्त चेंडू टाकायचा नसतो, असं द्रविड म्हणाले.

राहुल द्रविड काय म्हणाले?

“कुठल्याही गोलंदाजाला वाइड किंवा नो बॉल टाकायचा नसतो. खासकरुन टी 20 क्रिकेटमध्ये अतिरिक्त चेंडूमुळे तुमचं जास्त नुकसान होऊ शकतं. युवा खेळाडूंबद्दल आपल्याला थोडा संयम बाळगावा लागेल. टीममध्ये अनेक युवा खेळाडू आहेत. खासकरुन आपल्याकडे युवा वेगवान गोलंदाज आहेत. त्यांच्याकडून वाइड किंवा नो बॉल सारखी चूक होऊ शकते” असं राहुल द्रविड म्हणाले.

दोघांचा फ्लॉप शो

“युवा खेळाडू सुधारणेसाठी खेळाडू कठोर मेहनत घेत आहेत. आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करतोय” असं राहुल द्रविड म्हणाले. दुसऱ्या टी 20 सामन्यात गोलंदाज आणि फलंदाज दोघेही चालले नाहीत. भारतीय गोलंदाजांनी भरपूर धावा लुटवल्या. टीम इंडियाची टॉप ऑर्डरही या मॅचमध्ये फ्लॉप ठरली. भारतासाठी सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेलने सर्वाधिक धावा केल्या. दोघांनी अर्धशतकं झळकावली. मात्र, तरीही टीम इंडियाचा 16 धावांनी पराभव झाला.