IND vs SL 1st Test: ‘बापू’ ने श्रीलंकेची वाट लावली, तीन दिवसात कसोटीचा निकाल

IND vs SL 1st Test: टी-20 सीरीज प्रमाणे कसोटी मालिकेवरही (Test Series) भारताचं वर्चस्व कायम आहे. मोहालीतील पहिल्या कसोटी सामन्याचा (Mohali Test) अवघ्या तीन दिवसात निकाल लागला.

IND vs SL 1st Test: बापू ने श्रीलंकेची वाट लावली, तीन दिवसात कसोटीचा निकाल
भारताच्या विजयाचा हिरो रवींद्र जाडेजा
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 06, 2022 | 4:21 PM

मोहाली: टी-20 सीरीज प्रमाणे कसोटी मालिकेवरही (Test Series) भारताचं वर्चस्व कायम आहे. मोहालीतील पहिल्या कसोटी सामन्याचा (Mohali Test) अवघ्या तीन दिवसात निकाल लागला. भारताने श्रीलंकेवर एक डाव आणि 222  धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयाचा हिरो ठरला रवींद्र जाडेजा. (Ravindra jadeja) रवींद् जाडेजाच्या ऑलराऊंडर खेळाच्या बळावर भारताने या विजयाची नोंद केली. रवींद्र जाडेजाच्या नाबाद 175 धावांच्या खेळीच्या बळावर भारताने आपला पहिला डाव आठ बाद 574 धावांवर घोषित केला. रवींद्र जाडेजाना दोन्ही डावात मिळून एकूण नऊ विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांनी आपली भूमिका चोख बजावली. मोहालीतील पंजाब क्रिकेट असोशिएशच्या हळूहळू फिरकीला अनुकूल होत जाणाऱ्या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला. आज कसोटीच्या तिसऱ्यादिवशी कालच्या चार बाद 108 वरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर श्रीलंकेचा संपूर्ण संघ 174 धावात ऑलआऊट झाला. श्रीलंकेच्या उर्वरित सहा फलंदाजांनी फक्त 66 धावांची भर घातली.

अश्विन-जाडेजा जोडीने गुंडाळलं

फलंदाजी प्रमाणे गोलंदाजीत रवींद्र जाडेजाने जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याच्या वळणाऱ्या चेंडूंनी श्रीलंकेचा घात केला. त्याने एकट्याने श्रीलंकेचा निम्मा संघ गारद केला. तेरा षटकात चार निर्धाव 41 धावा असं त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण होतं. रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन विकेट घेऊन त्याला चांगली साथ दिली. पहिल्या डावात श्रीलंकेकडून पाथुम निसांकाने फक्त 61 धावांची खेळी केली. अन्य फलंदाज अपयशी ठरले. भारताकडे 400 धावांची मोठी आघाडी होती. त्यामुळे फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. जो गोलंदाजांनी पूर्णपणे योग्य ठरवला. दुसऱ्या डावातही श्रीलंकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत.

खेळपट्टीचा उचलला अचूक फायदा

दुसऱ्याडावातही अश्विन-जाडेजाच्या फिरकी समोर लंकन फलंदाजांनी गुडघे टेकले. दोघांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात श्रीलंकेकडून दिमुथ करुणारत्ने 27, मॅथ्यूज 28, धनंजय डिसिलिव्हा 30 आणि चरिथ असालंका 20 अशा धावा केल्या. पण एकही फलंदाज मोठी खेळी करु शकला नाही. डिकवेलाने एकट्याने नाबाद अर्धशतकी (51) खेळी केली. भारताने या कसोटीवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. भारताने 222 धावांनी एका मोठ्या विजयाची नोंद केली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. दुसरा डे-नाईट कसोटी सामना असून तो बंगलोरला खेळवला जाणार आहे.