INDvsSL : प्लेइंग 11 मध्ये नसलेल्या खेळाडूने त्या गेमचेंजर कॅचने भारताला जिंकवलं, पाहा व्हिडीओ
IND vs SL Match Turning Point : या थरारक सामन्यामध्ये भारतीय खेळाडूंनी डोळ्यात तेल घातल्यासारखी फिल्डिंग केली. सामना शेवटपर्यंत श्रीलंकेच्या हातात होता, मात्र एका बाहेर बसलेल्या खेळाडूने कडक कॅच घेत सामना फिरवला.

मुंबई : भारत आणि श्रीलंकेमध्ये झालेल्या सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला आहे. भारताने 41 धावांनी हा सामना जिंकत आशिया कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. श्रीलंकेच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावून घेतलाय. गोलंदाजांनी केलेल्या दमदार कागिरीच्या जोरावर हा सामना भारताने जिंकला. भारताचा डाव 213 धावांवर आटोपला होता. श्रीलंका हे आव्हान सहज पूर्ण करेल असं वाटत होतं मात्र सांघिक कामगिरीच्या जोरावर सामना फिरवला.
या थरारक सामन्यामध्ये भारतीय खेळाडूंनी डोळ्यात तेल घातल्यासारखी फिल्डिंग केली. सामना शेवटपर्यंत श्रीलंकेच्या हातात होता, मात्र एका बाहेर बसलेल्या खेळाडूने कडक कॅच घेत सामना फिरवला. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सूर्यकुमार आहे. सूर्याला फिल्डिंगसाठी मैदानात घेतलं होतं, त्याने सुपर डाय मारत गमेचेंझर कॅच घेतला. तर दुसरा कॅच शुबमन गिल याने घेतला.
पाहा व्हिडीओ-:
What A Brilliant Catch By Our SKY 🤩🔥#INDvsSL #SuryaKumarYadav pic.twitter.com/PQOnFmnXQL
— SKY FC 💙 (@Surya_fanclub_) September 12, 2023
Woowww what a catch by suryaa bhaau.#INDvSL #SuryaKumarYadav #ViratKohli #HardikPandya #AsiaCup23 pic.twitter.com/IGNIu9XKlF
— Ankit Dwivedi (@im_ankitdwivedi) September 13, 2023
श्रीलंकेला जास्त चेंडूंमध्ये कमी धावांची गरज होती, त्यावेळी मैदानात दुनिथ वेललागे आणि धनंजया डी सिल्वा मैदानात होते. दोघेही सेट झाले होते आणि एकेरी दुहेरी धावा काढत भारतावर दबाव टाकत होते. काहीवेळ श्रीलंका सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. मात्र दोन कॅच आणि संपूर्ण सामना फिरला.
जडेजाच्या गोलंदाजीवर धनंजया डी सिल्वा मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला. शुबमन गिलने तो कॅच पकडला. त्यानंतर हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर महेश तीक्ष्णा याचा सूर्याने अप्रतिम झेल घेतला. दोन कॅचमुळे संपूर्ण सामना फिरला आणि भारतीय संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
