IND vs SL : श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात ‘या’ मॅचविनर खेळाडूला बाहेरचा रस्ता
IND vs SL : रोहित शर्मा के. एल. राहुल याला विश्रांती देत सूर्यकुमार यादव याला संधी देईल असं वाटलं होतं. मात्र संघातून एका ऑल राऊंडरला बाहेर केलं गेलं आहे.

मुंबई : आशिया कपमध्ये भारत आणि श्रीलंकेमधील सामन्यात भारताने आपल्या प्लेइंग 11 मोठा बदल केला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात ज्याने महत्त्वाची विकेट घेतली त्यालाच डच्चू दिला आहे. रोहित शर्मा के. एल. राहुल याला विश्रांती देत सूर्यकुमार यादव याला संधी देईल असं वाटलं होतं. मात्र संघातून एका ऑल राऊंडरला बाहेर केलं गेलं आहे. या खेळाडूला बाहेर करत ऑल राऊंडर अक्षर पटेल याला संधी मिळाली नाही.
कोणाला दाखवला बाहेरच रस्ता?
श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यामध्ये आज प्लेइंग 11 मधून शार्दुल ठाकूर याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याच्या जागी अक्षर पटेल याला संघात संधी मिळाली आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये मोहम्मद रिझवान याला आऊट करत पाकिस्तानला तिसरा धक्का दिला होता. मोहम्मद रिझवान अशा खेळाडूंपैकी आहे, जो एकदा मैदानात टिकला की लवकर काही आऊट होत नाही. असे अनेक सामने त्याने पाकिस्तान संघाला जिंकून दिला आहे.
श्रेयय अय्यर फिट तरीही संघाबाहेर
श्रेयस अय्यर टीम इंडियाचा मिडल ऑर्डरमधील प्रमुख फलंदाजांपैकी एक खेळाडू आहे. मात्र पाकिस्तानविरूद्ध सामन्याआधी त्याला पाठीत वेदना जाणवू लागल्याने त्याच्या जागी राहुलला संधी देण्यात आली होती. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यासाठी तो फिट झाला होता मात्र बीसीसीआयच्या वैद्यकीय विभागाने विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
