IND vs SL Asia cup 2023 Highlights | टीम इंडियाचा रंगतदार सामन्यात विजय, श्रीलंकेवर 41 धावांनी मात
IND vs SL Live Score Asia cup 2023 Updates : आशिया कपमधील चौथा सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला तर फायनलमधील भारताचं स्थान पक्कं होणार आहे.

मुंबई | टीम इंडियाने सुपर 4 मध्ये श्रीलंकेला 41 धावांनी पराभूत करत आशिया कप 2023 फायनलमध्ये एन्ट्री घेतली आहे. श्रीलंकेला टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 214 धावांचं आव्हान दिलं होत. मात्र श्रीलंकेला ऑलआऊट 172 धावाच करता आल्या. टीम इंडियाने या विजयासह श्रीलंकेचा विजयरथ रोखला. आता या पराभवामुळे पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्यात चांगलीच रंगत पाहायला मिळणार आहे. कारण हा सामना जिंकणारी टीम अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध खेळेल. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. हा सामना गुरुवारी 14 सप्टेंबरला होणार आहे.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | दासुन शानाका (कॅप्टन), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा आणि मथीशा पाथिराना.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
LIVE NEWS & UPDATES
-
Ind vs SL cricket live Score | टीम इंडियाचा श्रीलंकेवर विजय
कोलंबो | टीम इंडियाने सुपर 4 मधील सामन्यात श्रीलंकेवर 41 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या 214 धावांचा बचाव करत लंकेला 172 धावांवर ऑलआऊट केलं. टीम इंडियाने या विजयासह आशिया कप फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
-
Ind vs SL cricket live Score | सूर्यकुमार यादव याची भन्नाट कॅच, मॅच निर्णायक स्थितीत
कोलंबो | सब्टीट्यूड सूर्यकुमार यादव याने निर्णायक कॅच घेतला आहे. सूर्याने हवेत उडी घेत महेश थेक्षणा याचा कॅच घेतला. यासह श्रीलंकेने आठवा विकेट गमावला.
-
-
Ind vs SL cricket live Score | टीम इंडियाचं कमबॅक, लंकेला सातवा झटका
कोलंबो | रवींद्र जडेजा याने धनंजय डी सील्वा आणि दिमुथ वेललागे ही सेट जोडी फोडली आहे. जडेजाने धनंजयला 41 धावांवर कॅच आऊट केलं. शुबमन गिल याने धनंजयचा कडक कॅच घेतला.
-
Ind vs SL cricket live Score | श्रीलंकेची सातव्या विकेटसाठीअर्धशतकी भागीदारी, सामना रंगतदार स्थितीत
कोलंबो | दुनिथ वेललागे आणि धनंजया डीसिल्वा या जोडीने सातव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली आहे. या जोडीच्या भागीदारीमुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.
-
Ind vs SL cricket live Score | रोहित शर्माचा भन्नाट कॅच, दासून शनाका आऊट
कोलंबो | कुलदीप यादव याने श्रीलंकेला मोठा झटका दिला आहे. कुलदीपने श्रीलंका कॅप्टन दासून शनाका याला टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्या हाती कॅच आऊट केला. दासूनने 9 रन्स केल्या.
-
-
Ind vs SL cricket live Score | चरीथ असलंका आऊट
कोलंबो | श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. कुलदीप यादव याने चरीथ असलंका याला आऊट केलंय. चरीथ असलंका याने 22 धावा केल्या.
-
Ind vs SL cricket live Score | सदीरा समराविक्रमा आऊट
कोलंबो | कुलदीप यादव याने श्रीलंकेला चौथा धक्का देत पहिली शिकार केली आहे. कुलदीपने सदीरा समराविक्रमा याला विकेटकीपर केएल राहुल याच्या हाती स्टंपिंग आऊट केलंय.
-
Ind vs SL cricket live Score | दिमुथ करुणारत्ने आऊट, टीम इंडियाची जबरदस्त सुरुवात
कोलंबो | मोहम्मद सिराज याने श्रीलंकेला तिसरा झटका पहिली शिकार केली आहे. सिराजने दिमुथ करुणारत्ने याला आऊट केलं. दिमुथ करुणारत्ने 2 धावांवर आऊट झाला.
-
Ind vs SL cricket live Score | कुसल मेंडीस आऊट
कोलंबो | जसप्रीत बुमराह याने श्रीलंकेला दुसरा झटका दिला आहे बुमराहने कुसल मेंडीस याला सूर्यकुमार यादव (SUB) याच्या हाती 15 धावांवर कॅच आऊट केलं.
-
Ind vs SL cricket live Score | जसप्रीत बुमराहची शिकार, पाथुम निसांका आऊट
कोलंबो | जसप्रीत बुमराह याने श्रीलंकेला पहिला झटका दिलाय. बुमराहने विकेटकीपर केएल राहुल याच्या हाती पाथुम निसांका याला कॅच आऊट केलंय. पाथुम 6 धावांवर आऊट झाला.
-
Ind vs SL cricket live Score | श्रीलंकसमोर 214 धावांचं आव्हान
कोलंबो | टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 49.1 ओव्हरमध्ये ऑलआऊट 213 धावा केल्या. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा याने 53 धावांची खेळी केली. तर श्रीलंकेकडून दुनिथ वेललागे याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.
-
Ind vs SL cricket live score | पावसानंतर सामन्याला सुरुवात
कोलंबो | पावसाच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया-श्रीलंका सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी सुरुवात झाली आहे. अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज ही शेवटचीजोडी मैदानात खेळत आहे.
-
Ind vs SL cricket live score | पावसामुळे खेळ थांबला
कोलंबो | टीम इंडिया-श्रीलंका सामन्यात पावसाने एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे खेळ थांबला आहे. पावसाने एन्ट्री घेण्याआधी टीम इंडियाने 47 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 197 धावा केल्या आहेत. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल दोघेही नाबाद खेळत आहेत.
-
Ind vs SL cricket live score | रवींद्र जडेजा आऊट
कोलंबो | रवींद्र जडेजा 4 धावा करुन आऊट झालाय. टीम इंडियाने सातवी विकेट गमावलीय.
-
Ind vs SL cricket live score | दुनिथ वेल्लालागे याचा पंच, टीम इंडियाला सहावा झटका
कोलंबो | दुनिथ वेल्लालागे याने हार्दिक पंड्या याला आऊट करत पाच विकेट्स पूर्ण केल्या आहेत. दुनिथ यासह टीम इंडिया विरुद्ध पाच विकेट्स घेणारा चौथा फिरकी गोलंदाज ठरला आहे.
-
Ind vs SL cricket live score | अर्धा संघ तंबूत, टीम इंडियाला पाचवा झटका
कोलंबो | टीम इंडियाने पाचवी विकेट गमावली आहे. ईशान किशन 33 धावा करुन आऊट झाला आहे.
-
IND vs SL Super 4 Live Score : विराट कोहली आऊट
दुनिथ वेललागे याने टीम इंडियाला दुसरा झटका दिला आहे. दुनिथ वेललागे याने विराटला 3 धावांवर आऊट केलं आहे. मैदानात आता ईशान किशन उतरला आहे.
-
Ind vs SL match live score : रोहित शर्माचं अर्धशतक
रोहित शर्मा याने अवघ्या 44 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. यामध्ये त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. 163 डावांमध्ये रोहितने सर्वात वेगवान 8000 धावा पूर्ण केल्या आहेत.
-
IND vs SL Live Score : शुबमन गिल आऊट
दुनिथ वेललागे याने टीम इंडियाला पहिला झटका दिला आहे. दुनिथ वेललागे याने शुबमन गिल याला 19 धावांवर क्लिन बो्ल्ड केलं. मागील सामन्यातील शतकवीर विराट कोहली मैदानात उतरला आहे.
-
ind vs sl live update: रोहित-शुबमनची 50 धावांची सलामी
शुबमन गिल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली आहे. या दोघांनी पहिल्या 10 ओव्हरमध्ये नाबाद 65 धावांची भागीदारी केली. रोहित-शुबमन यांच्यातील नववी अर्धशतकी भागीदारी ठरली. रोहित शर्मा याने या दरम्यान 10 हजार वनडे धावा पूर्ण केल्या.
-
ind vs sl live score : रोहित शर्माच्या 10000 धावा पूर्ण
भारत आणि श्रीलंकेमधील सामन्यात रोहित शर्माने आपल्या वन डे करिअरमधील 10,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. दहा हजार धावा सर्वात कमी डावात पूर्ण करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.
-
ind vs sl live score : …तर भारत पाकिस्तानमध्ये होणार फायनल
आशिया कपमधील राहिलेल्या सामन्यांमध्ये पाऊस आला तर भारत आणि श्रीलंकेमध्ये फायनल सामना होणार असल्याची माहिती समजत आहे.
-
ind vs sl update : रोहितचा श्रीलंकेविरूद्ध 50 वा सामना
रोहित शर्मा याचा श्रीलंकेविरूद्ध 50 वा सामना आहे. रोहितने पहिल्याच ओव्हरपासून आक्रमक पवित्रा घेतलेला दिसत आहे. 4 ओव्हर्सनंतर रोहित नाबाद 12 धावा आणि गिल 5 धावांवर खेळत आहे.
-
ind vs sl live score: श्रेयस अय्यर बाहेर
श्रेयस अय्यरला बरे वाटत आहे पण पाठीच्या दुखण्यापासून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने विश्रांतीचा सल्ला दिला आहे आणि श्रीलंकेविरुद्धच्या भारताच्या सुपर 4 सामन्यासाठी आज तो संघासोबत स्टेडियममध्ये गेला नाही.
-
ind vs sl update : ‘या’ स्टार खेळाडूला डच्चू
श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात भारताने मोठ बदल केला आहे. अक्षर पटेल याला संघात स्थान दिलं आहे. संघातून शार्दुल ठाकूर याला वगळण्यात आलं आहे.
-
ind vs sl live update : दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (W), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (C), दुनिथ वेललागे, महेश तीक्ष्णा, कसुन राजिता, मथेशा पथिराणा
-
ind vs sl live update : रोहित शर्माने जिंकला टॉस
भारत आणि श्रीलंकेमधील सामन्याचा टॉस श्रीलंका संघाने जिंकला आहे. कर्णधार रोहित शर्माने प्रथम बॅटींगचा निर्णय घेणार आहे.
-
ind vs sl live update : भारत पाकिस्तान हेड टू हेड
भारत आणि श्रीलंका संघामध्ये आतापर्यंत एकूण 165 सामने झाले आहेत. यामधील 96 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. तर 57 सामने श्रीलंकेने जिंकले असून 11 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.
Published On - Sep 12,2023 12:58 PM
