IND vs SL: जयंतला विकेट मिळत नव्हत्या म्हणून मैदानात जाडेजा-अश्विनने दाखवला मनाचा मोठेपणा

| Updated on: Mar 07, 2022 | 5:53 PM

IND vs SL: भारताने काल मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना (India vs Srilanka First Test) मोठ्या फरकाने जिंकला. हा सामना वेगवेगळया कारणांसाठी लक्षात ठेवता येईल.

IND vs SL: जयंतला विकेट मिळत नव्हत्या म्हणून मैदानात जाडेजा-अश्विनने दाखवला मनाचा मोठेपणा
Follow us on

मोहाली: भारताने काल मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना (India vs Srilanka First Test) मोठ्या फरकाने जिंकला. हा सामना वेगवेगळया कारणांसाठी लक्षात ठेवता येईल. कॅप्टन म्हणून रोहित शर्माचा (Rohit sharma) पहिलाच कसोटी सामना, विराट कोहलीची 100 वी टेस्ट मॅच, अश्विनने मोडलेला कपिल देव यांचा विक्रम आणि रवींद्र जाडेजाचा सुपर परफॉर्मन्स. मोहालीमधला कसोटी विजय लक्षात ठेवण्यासाठी अशी वेगवेगळी बरीच कारण आहे. हा सामना लक्षात ठेवण्यासाठी आणखी एक वेगळ कारणही आहे. टीम स्पिरिट, संघ भावना काय असते, त्याचं उत्तम उदहारण रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) आणि आर. अश्विनने सादर केलं. कारण अशी संघ भावना असते, तेव्हा विजय मिळवणं अधिक सोपं होतं. पराजयानंतरही खचून न जाता उभ रहाता येते. मॅचमध्ये तुम्ही यश मिळवत असाल, तेव्हा संघातील सहकारी खेळाडूंचा सुद्धा विचार करणं तितकचं आवश्यक असतं.

जाडेजा आणि अश्विनने मोहाली कसोटीत हेच केलं. त्यामुळे खेळाडू असण्याबरोबर व्यक्ती म्हणून ते आपल्या सहकाऱ्यांबद्दल कसा विचार करतात ते दिसलं. सामना संपल्यानंतर अश्विनने कॅमेऱ्यासमोर बोलताना ही गोष्ट सांगितली.

जड्डूने मनाचा मोठेपणा दाखवला

“या सामन्यामध्ये जयंत यादवही खेळत होता. जयंतने या सामन्यात जास्त गोलंदाजी केली नसल्याचं आमच्या लक्षात आलं. जेव्हा तिसरा फिरकी गोलंदाज तुमच्या संघात असतो, तेव्हा त्याची काळजी घेणं आवश्यक असतं. जड्डूने सर्वात आधी त्याच्या वाट्यची षटक जयंतला देण्याचं ठरवलं. जिथून मदत मिळत होती, त्या एन्डकडून काही षटक दिली. त्यानंतर मी माझ्या एन्डकडून काही षटक दिली. जड्डूने आपल्या वाटयाची षटकं देऊन मनाचा मोठेपणा दाखवला” असं अश्विनने सांगितलं.

अश्विन-जाडेजाला या सामन्यात बऱ्याच विकेट मिळाल्या. पण जयंत यादवला दोन्ही डावात यश मिळालं नाही. जाडेजा-अश्विन यशस्वी ठरत होते. पण म्हणून त्यांनी आपल्या सहकाऱ्याकडे दुर्लक्ष केलं नाही. त्यांनी त्याला लक्षात ठेवलं, ही एक मोठी गोष्ट आहे.

त्याचं प्रतिबिंब त्याच्या फलंदाजीत उमटत

हा सामना संपल्यानंतर रविचंद्रन अश्विनने रवींद्र जाडेजांच कौतुक केलं. मागच्या चार-पाच वर्षात रवींद्रने आपल्या खेळात बरीच सुधारणा केली आहे. सध्या तो खूप खालच्या क्रमांकावर फलंदाजी करतो, असं मला वाटतं. तो सध्या कमालीची फलंदाजी करतोय. तो काय करतोय, हे त्याला माहित आहे आणि त्याचं प्रतिबिंब त्याच्या फलंदाजीत उमटत अशा शब्दात अश्विनने जाडेजाचं कौतुक केलं.