IND vs WI: रोहितला फिटनेसवरुन बोलता, त्याची ही सुपर कॅच एकदा नक्की पाहा VIDEO

| Updated on: Feb 16, 2022 | 11:07 PM

IND vs WI: वेस्ट इंडिजला आपल्या बॅटचा तडाखा दाखवणाऱ्या कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) आज तितकच कमालीचं क्षेत्ररक्षणही केलं.

IND vs WI: रोहितला फिटनेसवरुन बोलता, त्याची ही सुपर कॅच एकदा नक्की पाहा VIDEO
Follow us on

कोलकाता: वेस्ट इंडिजला आपल्या बॅटचा तडाखा दाखवणाऱ्या कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) आज तितकच कमालीचं क्षेत्ररक्षणही केलं. वेस्ट इंडिजने भारताला (India vs West indies) विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य दिलं आहे. वेस्ट इंडिजच्या टीममध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. असे फलंदाज त्यांच्या संघात आहेत. मैदानावर निकोलस पूरन, मेयर्स आणि पोलार्डने (pollard) तशी फटकेबाजीही केली. वेस्ट इंडिजचा संघ मोठी धावसंख्या उभारु शकला असता. पण कॅप्टन रोहित शर्माने गोलंदाजीत हुशारीने बदल करत त्यांना 157 धावांवर रोखलं. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

रोहित शर्माने आज क्षेत्ररक्षणतही तितकच कमलीच केलं. हर्षल पटेलच्या शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ओडियन स्मिथचा त्याने जबरदस्त झेल घेतला. हर्षल पटेलच्या स्लोअर चेंडूवर स्मिथने लाँग ऑफला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा अंदाज चुकला. झेल घेण्यासाठी रोहित शर्मा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उलटा पळाला. त्याचवेळी सीमारेषेवरुन सूर्यकुमार यादवही झेल घेण्यासाठी येत होता. रोहितला पाहून धडक टाळण्यासाठी तो थांबला व रोहितने स्मिथचा अप्रतिम झेल घेतला.

टि्वटरवर रोहित शर्माचं या झेलसाठी कौतुक होत आहे. काहीजण रोहितला त्याच्या फिटनेसवरुन ट्रोल करतात. पण रोहित शर्माचा हा झेल नक्की पाहिला पाहिजे, असे अनेक युजर्सनी म्हटलं आहे.

रोहित शर्माच या झेलसाठी कौतुक होत आहे. 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने भारताला जबरदस्त सुरुवात करुन त्याने 19 चेंडूत 40 धावा तडकावल्या. यात चार चौकार आणि तीन षटकार होते.