IND VS ZIM: केएल राहुल 5 खेळाडूंना बाहेर बसवणार? कोणाचा पत्ता कट होणार?

इंग्लंड, वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरात जाऊन हरवलं. आता टीम इंडिया झिम्बाब्वे मध्ये दाखल झाली आहे. तिथे तीन सामन्यांची वनडे सीरीज खेळली जाणार आहे.

IND VS ZIM: केएल राहुल 5 खेळाडूंना बाहेर बसवणार? कोणाचा पत्ता कट होणार?
Indian players
Image Credit source: twitter
| Updated on: Aug 17, 2022 | 6:11 PM

मुंबई: इंग्लंड, वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरात जाऊन हरवलं. आता टीम इंडिया झिम्बाब्वे मध्ये दाखल झाली आहे. तिथे तीन सामन्यांची वनडे सीरीज खेळली जाणार आहे. भारतीय संघ गुरुवारी पहिल्या वनडे मध्ये झिम्बाब्वेला भिडणार आहे. हरारे मध्ये हा सामना होणार आहे. केएल राहुलकडे संघाचं नेतृत्व आहे. आयपीएल नंतर तो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. राहुलला आधी दुखापत झाली. त्यानंतर त्याला कोविडची बाधा झाली होती. आता तो फिट असून कॅप्टनशिप भुषवणार आहे. आता प्रश्न हा आहे की, राहुल कुठल्या 11 खेळाडूंना पहिल्या वनडेत संधी देईल?

भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल?

झिम्बाब्वे विरुद्ध कॅप्टन केएल राहुल ओपनिंग करताना दिसेल. त्याच्यासोबत शिखर धवन क्रीजवर उतरणार आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरीज मध्ये शुभमन गिल ओपनिंगला आला होता. पण आता तो मधल्या फळीत खेळणार आहे. राहुल त्रिपाठी तिसऱ्या स्थानावर उतरु शकतो. रिपोर्ट्सनुसार राहुल त्रिपाठीला वनडे मध्ये डेब्युची संधी दिली जाऊ शकते. विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन आणि इशान किशनचा पर्याय आहे. पण संधी एकालाच मिळेल.

इशान किशनला मधल्या फळीत संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. संजू सॅमसन विकेटकीपिंगची जबाबदारी संभाळू शकतो. दीपक हुड्डा सहाव्या क्रमांकावर उतरेल. अक्षर पटेल ऑलराऊंडरची भूमिका निभावू शकतो.

गोलंदाजी युनिट मध्ये कोण-कोण?

भारत चार रेग्युलर गोलंदाजांसह मैदानात उतरु शकतो. यात दीपक चाहर असेल. दुखापतीमुळे दीपक चाहर मागच्या सहा महिन्यापासून क्रिकेट खेळलेला नाही. तो या मालिकेद्वारे पुनरागमन करणार आहे. दीपक चाहरच्या प्रदर्शनावर सिलेक्टर्सची नजर आहे. त्याशिवाय कुलदीप यादवचाही प्लेइंग इलेव्हन मध्ये समावेश केला जाऊ शकतो. वेगवान गोलंदाजीत आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळू शकते. मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड, शाहबाज अहमद, इशान किशन आणि शार्दुल ठाकूर पहिल्या वनडेत बेंचवर बसलेले दिसू शकतात.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- केएल राहुल, शिखर धवन, राहुल त्रिपाठी, शुभमन गिल, संजू सॅमसन, दीपक हुड्डा, अक्षर पटेल, दीपक चाहर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान.