भारत झिम्बाब्वे तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये पुन्हा बदल, श्रेयस अय्यर टॉस जिंकल्यानंतर म्हणाला…

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी20 मालिकेतील शेवटचा सामना होत आहे. भारताने ही मालिका आधीच 2-0 ने खिशात घातली आहे. तिसरा सामना औपचारिक असला तरी क्लिन स्विप देण्याचा टीम इंडियाचा मानस आहे.

भारत झिम्बाब्वे तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये पुन्हा बदल, श्रेयस अय्यर टॉस जिंकल्यानंतर म्हणाला...
भारत झिम्बाब्वे तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये पुन्हा बदल, श्रेयस अय्यर टॉस जिंकल्यानंतर म्हणाला...
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 26, 2026 | 4:10 PM

भारताने झिम्बाब्वेविरुद्धची तीन सामन्यांची टी20 मालिका आधीच 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा औपचारिक आहे. मात्र या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया झिम्बाब्वेला क्लिन स्विप देण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताने ही मालिका 3-0 ने जिंकली तर आयसीसी क्रमवारीत नक्कीच फायदा होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात 7 गडी राखून, तर दुसऱ्या टी20 सामन्यात 90 धावांनी विजय मिळवला होता. आता तिसऱ्या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. श्रेयस अय्यरने सलग आठ सामन्यान नाणेफेक जिंकली होती. पण दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला होता. आता पुन्हा एकदा नाणेफेक जिंकत नवा प्रवास सुरू केला आहे.

काय म्हणाला श्रेयस अय्यर?

कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘कालच्यासारखीच खेळपट्टी असल्याने आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. खेळ जसजसा पुढे जाईल तसतशी खेळपट्टी संथ होईल अशी अपेक्षा आहे. आम्हाला लवकर जुळवून घेणे महत्त्वाचे असेल. आम्ही एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू. संघात दोन बदल, प्रिन्स बाहेर गेल्याने अशोक संघात आला आहे, शिवम दुबेच्या जागी सूर्यांशला संधी मिळाली आहे.’

काय म्हणाला सिकंदर रझा?

झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा म्हणाला की, ‘आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती. संघाला कर्णधाराकडून अजून थोड्या धावांची गरज आहे. आशा आहे की माझी आणि संघाची कामगिरी चांगली होईल. आज सकाळी संघात सक्तीचा बदल करण्यात आला आहे, रिचर्ड नगारवाला किरकोळ दुखापत झाल्यामुळे वेलिंग्टन मसाकाद्झा खेळत आहे.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): ब्रायन बेनेट, बेन कुरान, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, वेस्ली मधेवेरे, तादिवानाशे मारुमनी (विकेटकीपर), ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्याम्हुरी, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुझाराबानी.

भारत (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, रवी बिश्नोई, अशोक शर्मा, यश ठाकूर, मयंक यादव.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us