रोहित शर्माने सांगितला कर्णधारपदाचा कार्यकाळ कसा होता? वैयक्तिक धावा आणि ‘ती’ खंत अखेर बोलून दाखवली

रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात टीम इंडियाने नवी शिखरं गाठली आहेत. आयसीसी स्पर्धेतही चांगली कामगिरी केली आहे. तसेच काही मालिका जिंकून कर्णधारपद योग्यरित्या भूषवत असल्याचं दाखवून दिलं आहे. माजी क्रिकेट दिनेश कार्तिक याने रोहित शर्माची मुलाखत घेतली. त्यात त्याने तीन वर्षाच्या कार्यकाळातील अख्खा पाढा वाचला आणि एक खंत बोलून दाखवली.

रोहित शर्माने सांगितला कर्णधारपदाचा कार्यकाळ कसा होता? वैयक्तिक धावा आणि ती खंत अखेर बोलून दाखवली
कर्णधारपदाच्या कार्यकाळात मागची तीन वर्ष चांगली गेली, पण...! रोहित शर्माने बोलून दाखवलं मनातलं दु:ख
| Updated on: Jan 25, 2024 | 1:56 PM

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याने कर्णधार रोहित शर्मा याच्याशी संवाद साधला. प्रश्नाची सुरुवात मागच्या तीन वर्षाच्या कर्णधारपदाच काळ कसा होता? याबाबत विचारलं गेलं. तेव्हा रोहित शर्माने आपल्या अंदाजात उत्तर दिलं. तसेच एक खंत बोलून दाखवली. “कर्णधारपद भूषवणं हे स्वप्न होतं. पण तुमच्यावर एक जबाबदारी देखील असते. जेव्हा माझ्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी आली तेव्हा मी उत्साहित होतो. मी गेली सात आठ वर्ष त्या कोर ग्रुपचा सदस्य होतो. निर्णय घेण्यात असो की उपकर्णधापद भूषवणं असो. जेव्हा तुम्ही उपकर्णधार असता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की कधीही तुम्हाला कर्णधारपदाची भूमिका बजवावी लागू शकते. मी विराटच्या नेतृत्वात खेळलो आहे. दिग्गज कर्णधारांची रणनिती जवळून पाहिली आहे.” असं रोहित शर्माने सांगितलं.

“मागची तीन वर्षे खरंच चांगली गेली. पण आयसीसी स्पर्धेत अंतिम फेरीत पराभव जिव्हारी लागला. ती एकच गोष्ट आम्ही करु शकलो नाही. मला वाटते आमची वेळ नक्की येईल. भुतकाळात काय झालं याचा विचार करण्यात अर्थ नाही. कारण भुतकाळ काही बदलू शकत नाही. आता आमचं पुढच्या ध्येयावर लक्ष्य केंद्रीत आहे. “, असं कर्णधार रोहित शर्मा याने पुढे सांगितलं.

“वैयक्तिक आकडेवारी मी या संघातून बाहेर काढली आहे. प्रत्येक जण संघासाठी खेळत आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा चांगलं खेळता तेव्हा आपोआप तुमची वैयक्तिक आकडेवारी सुधारेल. त्यामुळे निर्धास्तपणे खेळणं हा माझा संघाला दिलेला मंत्र आहे. त्यामुळे प्रत्येक सांघिक कामगिरीवर लक्ष देत आहे. भारतात आकडेवारीवर खूप काही बोललं जातं. मी 2019 वर्ल्डकपमध्ये 500 धावा केल्या पण त्याचा काय उपयोग झाला. आम्ही हरलोच ना. त्याचा काही उपयोग नाही. मी रिटायर होईल तेव्हा त्याचा विचार करेन. पण मला तर ती ट्रॉफी पाहिजे ना. ट्रॉफी नसेल तर त्या वैयक्तिक धावांना काहीच अर्थ नाही.”, असं कर्णधार रोहित शर्मा पुढे म्हणाला.