IND vs SL : शिखर धवनने मैदानात पाऊल ठेवताच केला मोठा विक्रम, धोनी-कोहलीलाही टाकलं मागे

| Updated on: Jul 18, 2021 | 7:16 PM

भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु झाली आहे. पहिल्याच सामन्या कर्णधार शिखरने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करत इतिहास रचला आहे.

IND vs SL : शिखर धवनने मैदानात पाऊल ठेवताच केला मोठा विक्रम, धोनी-कोहलीलाही टाकलं मागे
शिखर धवन
Follow us on

कोलंबो : भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना सुरु झाला आणि भारताचा नवनिर्वाचित कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) एका मोठ्या विक्रमाला गवासणी घातली. शिखर भारतीय इतिहासातील संघाचा 25 वा कर्णधार असून सर्वाधिक वयात कर्णधार होण्याचा विक्रम शिखरने केला आहे. दिग्गज क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ आणि हेमू अधिकारी यांना मागे टाकत शिखरने हा विक्रम केला आहे. धवन कर्णधारपद स्वीकारताना 35 वर्ष 225 दिवसांचा आहे. याआधी हेमू अधिकारी हे 35 वर्ष आणि मोहिंदर अमरनाथ 34 वर्ष 37 दिवसांचे असताना कर्णधारपद स्वीकारलं होतं.

शिखर धवनने 11 वर्षांपूर्वी भारताकडून एकदिवसीय संघात पदार्पण केले होते.  2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या धवनचे तेव्हा वय 24 वर्षे होते. 11 वर्षानंतर कर्णधार होत इतक्या प्रतिक्षेनंतर कर्णधार होणाराही तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. भारतासाठी सर्वाधिक वन-डे खेळून कर्णधार होण्यात शिखरचा तिसरा नंबर लागतो. त्याने 142 वनडे खेळल्यानंतर कर्णधारपद स्वीकारलं. त्याच्याआधी नंबर अनिल कुंबळेचा लागतो अनिलने 217 वनडे खेळल्यानंतर कर्णधारपद स्वीकारलं. तर रोहित शर्माने 171 वनडे खेळल्यानंतर कर्णधारी स्वीकारली.

शिखरकडे 6000 धाव पूर्ण करण्याची संधी

शिखर धवनने आतापर्यंत भारताकडून 142 वनडे सामन्यांमध्ये 45.28 च्या सरासरीने 5 हजार 977 रन्स केले आहेत. त्याच्या नावावर 17 एकदिवसीय शतक आणि 32 अर्धशतक आहेत. 143 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे. दरम्यान श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात 23 धावा करताच शिखर एकदिवीसीय क्रिकेटमध्ये 6 हजार धावांचे शिखर पार करेल.

संबंधित बातम्या 

India vs Sri Lanka Live Score, 1st ODI : अखेर हार्दीकला यश, श्रीलंकेचा आठवा गडी तंबूत परत

India vs Sri Lanka Live Score, 1st ODI : कुलदीप यादवची जादू, एकाच ओव्हरमध्ये दोन महत्त्वाचे विकेट्स

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात संजूला संधी नाही, ‘या’ कारणामुळे एकदिवसीय संघातील स्थान हुकलं

(Indian Captain Shikhar Dhawan Makes many Records as captain at India vs Sri lanka 1st ODI)