विराट कोहलीकडून दिवाळी साजरी करण्याच्या टिप्स, नेटकरी म्हणाले, ‘आम्हाला अक्कल शिकवू नको, वर्ल्डकपवर लक्ष दे!’

| Updated on: Oct 19, 2021 | 8:56 AM

विराटने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने दिवाळी साजरी करण्याच्या टिप्स सांगितल्या आहेत. पण ट्विटर युजर्सना विराट कोहलीचे सल्ले आवडले नाहीत. युजर्सने विराटला ट्रोल करत, नसते उद्योग करुन आम्हाला शहाणपणा शिकवू नकोस, वर्ल्डकपकडे लक्ष दे, अशा आशयाच्या कमेंट केल्या आहेत.

विराट कोहलीकडून दिवाळी साजरी करण्याच्या टिप्स, नेटकरी म्हणाले, आम्हाला अक्कल शिकवू नको, वर्ल्डकपवर लक्ष दे!
विराट कोहली (कर्णधार)
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या या ना त्या कारणाने सतत चर्चेत आहे. गेल्या दोन दिवसांपासून विराट ट्विटरवर कमालीचा ट्रोल होतोय. विराटने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने दिवाळी साजरी करण्याच्या टिप्स सांगितल्या आहेत. पण ट्विटर युजर्सना विराट कोहलीचे सल्ले आवडले नाहीत. युजर्सने विराटला ट्रोल करत, नसते उद्योग करुन आम्हाला शहाणपणा शिकवू नकोस, वर्ल्डकपकडे लक्ष दे, अशा आशयाच्या कमेंट केल्या आहेत.

विराट कोहलीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. विराट कोहली त्या व्हिडीओमधून दिवाळी साजरी करण्याच्या टिप्स देत आहे. ‘जगभरातील लोकांसाठी हे एक कठीण वर्ष होते, भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लोकांना कठीण काळाचा सामना करावा लागला. आता आपण सगळे दिवाळीची तयारी करत आहोत, मी तुमच्या बरोबर दिवाळी साजरी करण्याच्या टिप्स शेअर करतोय.

विराट कोहलीच्या याट व्हिडीओवर नेटकरी संतापले आणि त्याला ट्रोल करायला लागले. तू तुझं काम बघ नाहीतर आम्हीही तुला विश्वचषक जिंकण्यासाठी टिप्स देऊ शकतो, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. एका युजर्सने लिहिलंय, तुझा मेसेज चांगला आहे. तू ईद, नाताळ आणि इतर सणांवर अशाच टिप्स द्याव्यात.

 

विराट कोहलीला नेटकऱ्यांनी त्याच्या बॅटिंगवर आणि वर्ल्डकपवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. फक्त दिवाळी सणालाच अशा टिप्स देत जाऊ नको. इतर सणांनाही अशा टिप्स देत चल, अशा तिरकस कमेंटही काही युजर्सने केल्या आहेत. काही युजर्सने विराटची शाळा घेत त्याचे जुने फोटो व्हायरल केले आहेत. एका फोटोत विराट फटाके फोडताना दिसतोय. तर त्यात विंडोमध्ये विराट फटाके फोडू नका, असं आवाहन करताना दिसतोय. विराटच्या या दुटप्पीपणावरही युजर्सने विराटला टोमणे मारलेत.

विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून ट्विटर युजर्सच्या निशाण्यावर आहे. विराटच्या आरसीबीला पुन्हा एकदा आयपीएल जिंकण्यात अपयश आलं तेव्हाही त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. विराट कोहलीने आता आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडले आहे. तसेच, या टी -20 विश्वचषकानंतर विराट कोहली या फॉरमॅटचंही भारतीय संघाचे कर्णधारपद सोडेल.

(Indian Captain Virat kohli Trolled After Share tips On Celebrating Diwali on twitter)

हे ही वाचा :

T20 World Cup 2021: श्रीलंकेचा नाम्बियावर 7 विकेट्सनी विजय, पण चर्चा ‘त्या’ कॅचची

T20 World Cup 2021, India vs England: सराव सामन्यात भारताची सरशी, इंग्लडवर 7 गडी राखून विजय

T20 World Cup 2021: कधी काळी डिलेव्हरी बॉय, आता विश्वचषकाच्या सामन्यात ‘सामनावीर’, स्कॉटलंडच्या खेळाडूची प्रेरणादायी कथा