T20 World Cup 2021: कधी काळी डिलेव्हरी बॉय, आता विश्वचषकाच्या सामन्यात ‘सामनावीर’, स्कॉटलंडच्या खेळाडूची प्रेरणादायी कथा

टी20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजेसच्या सामन्यात स्कॉटलंडने त्यांचा खेळाडू ख्रिस ग्रीव्ह्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बांग्लादेशचा 6 धावांनी पराभव केला.

T20 World Cup 2021: कधी काळी डिलेव्हरी बॉय, आता विश्वचषकाच्या सामन्यात 'सामनावीर', स्कॉटलंडच्या खेळाडूची प्रेरणादायी कथा
ख्रिस ग्रीव्ह्स

दुबई: क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यामध्ये जर मेहनत आणि कष्ट घेतले तर एकदिवस प्रयत्नांना नक्कीच यश येतं आणि खेळाडूचे दिवस बदलण्यास वेळ लागत नाही. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी अगदी हलाखीच्या परिस्थितीतून क्रिकेटच्या जोरावर कोट्याधीश झाले आहेत. असाच एक स्कॉटलंडचा खेळाडू जो विश्वचषकाच्या (T20 World Cup) पहिल्याच दिवशी सामनावीराचा मान मिळवण्यात यशस्वी झाला तो कधी काळी डिलेव्हरी बॉयचं काम करत होता.

ख्रिस ग्रीव्ह्स (Chris Greaves) असं या अष्टपैलू खेळाडूच नाव असून बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात ख्रिस ग्रीव्ह्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरच स्कॉटलंडने टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी बांगलादेशचा 6 धावांनी पराभव केला. या सामन्यात ख्रिसने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही प्रकारात अप्रतिम प्रदर्शन दाखवत बांग्लादेश संघाला अगदी पछाडून सोडलं. त्याने केलेल्या या खेळीमुळेच स्कॉटलंडचा संघ विजय मिळवण्यात यशस्वी झाला. या विजयानंतर संघाचा कर्णधार काइल कोएट्जर ( Kyle Coetzer) यानेच ख्रिसचं कौतुक करताना त्याची कथा सांगितली.

डिलेव्हरी बॉय ते सामनावीर

या दमदार विजयात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या ख्रिसचं सर्वच कौतुक करत होते. यावेळी स्कॉटलंडचा कर्णधार काइल कोएट्जर ( Kyle Coetzer) हा म्हणाला,”मला ख्रिस ग्रीव्सवर फार गर्व आहे. त्याने आयुष्यात फार संघर्ष केला आहे.  काही दिवसांपूर्वी तो घरी-घरी जाऊन पार्सल डिलीव्हरी करत होता. आता मात्र तो मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.’

ख्रिसची अष्टैपूल कामगिरी

ख्रिसने फलंदाजी दरम्यान 28 चेंडूत 45 धावा केल्या यावेळी त्याने 4 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्याने मार्क वॅटसोबत (17 चेंडूत 22) 51 धावांची भागीदारी देखील. त्यानंतर गोलंदाजीवेळी त्याने 3 ओव्हर्समध्ये 6.33 च्या इकॉनमी रेटने 19 धावा देत 2 विकेट घेतल्या आहेत.

असा झाला सामना

गट ब मधील या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना 9 गड्यांच्या बदल्यात 140 धावांचे माफक आव्हान उभे केले. मात्र बांगलादेशचे दिग्गज हे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरले. सलामीवीर जॉर्ज मंझीच्या 29 धावांच्या योगदानानंतरही स्कॉटलंड एका टप्प्यावर 6 बाद 53 धावांवर संघर्ष करत होता. त्यानंतर ग्रीव्ह्सने (28 चेंडूत 45 धावा, 4 चौकार, 2 षटकार) मार्क वॅट (17 चेंडूत 22) सोबत 51 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे स्कॉटलंडच्या संघाला 140 धावांपर्यंत मजल मारता आली.

आपला दुसरा सामना खेळणाऱ्या ग्रीव्ह्सने गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करत स्कॉटलंडला सामन्यात जिवंत ठेवले. बांगलादेश सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत असताना मुशफिकुर रहीम (36 चेंडूत 38) आणि शाकिब अल हसन (28 चेंडूत 20) सलग षटकांत बाद झाले. अखेर बांगलादेशचा संघ 7 विकेट्सच्या बदल्यात 134 धावाच करू शकला. अशा प्रकारे स्कॉटलंडने दोन महत्त्वाचे गुण मिळवले.

हे ही वाचा

…नाहीतर पेट्रोल पंपावर काम करत असतो, हार्दीक पंड्याने सांगितली व्यथा

कर्णधार कोहली तरसला एका रेकॉर्डसाठी, India vs Pakistan सामन्यात होणार विराटची नौका पार?

T20 World Cup 2021: पाकिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यास भारताला मोठं नुकसान, दंडही भरावा लागू शकतो

(Scotland won match against Bangladesh Scotland Cricketer chris greaves is man of the match he’s struggling story is real)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI