Team India | इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, रोहितसेनेची एकहाती सत्ता

Indian Cricket Team | टीम इंडियाने कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इतिहास रचला आहे. इंग्लंडला पाचव्या कसोटीत पराभूत केल्यानंतर टीम इंडियाला गूड न्यूज मिळाली आहे. नक्की काय झालंय? जाणून घ्या.

Team India | इंग्लंडचा धुव्वा उडवत टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी, रोहितसेनेची एकहाती सत्ता
| Updated on: Mar 10, 2024 | 8:10 PM

मुंबई | टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंडवर पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाचा इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील विजयी चौकार ठरला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांची मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाची हैदराबादमध्ये पराभवाने सुरुवात झाली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने सलग 4 सामने जिंकत मालिकाही जिंकली. टीम इंडियाला या विजयी चौकारानंतर आनंदाची बातमी मिळाली आहे. नक्की काय झालंय जाणून घेऊयात.

टीम इंडियान आयसीसी टेस्ट रॅकिंगमध्ये पहिल्या स्थानी पोहचली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पछाडत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. टीम इंडियाने यासह इतिहास रचला आहे. टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात तिन्ही फॉर्मेटमध्ये नंबर 1 ठरली आहे. टीम इंडिया याआधी वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये नंबर 1 होती. टीम इंडियाच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 122 रेटिंग्स पॉइंट्स आहेत. तर वनडे आणि टी 20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 121 आणि 266 रेटिंग्स आहेत.

न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. ऑस्ट्रेलिया या रँकिंगमध्ये 117 रेटिंग्ससह दुसऱ्या क्रमांकावर घसरली आहे. आता न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या मालिकेचा निकाल काहीही लागला, तरी त्याचा परिणाम टीम इंडियावर होणार नाही. टीम इंडिया कोणत्याही निकालानंतर नंबर 1 स्थानावरुन हटणार नाही.

टीम इंडिया जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेली होती. तेव्हा टीम इंडियाने दुसरा सामना जिंकत मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यामुळे टीम इंडियाला पहिलं स्थान गमवावं लागंल. मात्र आता टीम इंडियाने इंग्लंडला 4-1 ने पराभूत करत पुन्हा पहिलं स्थान काबिज केलं. तर इंग्लंड टीम तिसऱ्या स्थानावर पोहचली आहे. इंग्लंडच्या नावावर 111 रेटिंग्स आहेत.

टीम इंडिया जगात भारी

दरम्यान टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळी पॉइंट्स टेबलमध्येही नंबर 1 आहे. टीम इंडियाने इंग्लंडला पाचव्या कसोटीत पराभूत करत अव्वल स्थान आणखी मजबूत केलंय. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयामुळे टीम इंडिया अव्वल स्थानी पोहचली होती. तर आता पाचवा सामना जिंकल्याने टीम इंडियाची विजयी टक्केवारी ही आणखी सुधारली आहे.