IND vs SA | दक्षिण आफ्रिका टूर, टीम इंडिया कधी, कुठल्या तारखेला, किती वाजता खेळणार? जाणून घ्या सर्व शेड्यूल

IND vs SA | वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमधील कटू आठवणी मागे सोडून टीम इंडिया पुढे निघाली आहे. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला होता. डिसेंबरमध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरु होत आहे. या टूरवर टीम इंडिया कधी, कुठल्या तारखेला, किती वाजता खेळणार? हे सर्व शेड्यूल जाणून घ्या.

IND vs SA | दक्षिण आफ्रिका टूर, टीम इंडिया कधी, कुठल्या तारखेला, किती वाजता खेळणार? जाणून घ्या सर्व शेड्यूल
Team india upcoming south Africa Tour
Image Credit source: AFP
| Updated on: Dec 05, 2023 | 2:55 PM

IND vs SA | टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमधील पराभव मागे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. टीम इंडियासमोर आता पुढच आव्हान दक्षिण आफ्रिकेच आहे. टीम इंडिया डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडियाचा हा मोठा दौरा आहे. या दौऱ्यात टीम इंडिया टेस्ट, वनडे आणि टी 20 सीरीज खेळणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही टीम्सची घोषणा झाली आहे. आता प्रतिक्षा फक्त सीरीज सुरु होण्याची आहे. टीम इंडिया पुढच्या काही दिवसात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होईल. टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच सर्व शेड्युल जाणून घ्या.

वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला होता. त्यानंतर दोन्ही टीम्समध्ये पाच सामन्यांची टी 20 सीरीज खेळली गेली. या सीरीजमध्ये टीम इंडियाच्या सिनियर प्लेयर्सना विश्रांती देण्यात आली होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळली. टीम इंडियाने ही मालिका 4-1 च्या फरकाने जिंकली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अनेक सिनियर खेळाडू टीममध्ये कमबॅक करणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही T20 सीरीजमध्ये खेळणार नाहीत. दोघांनी विश्रांती मागितली आहे. वनडे आणि टेस्ट सीरीजसाठी दोघे उपलब्ध असतील.
कसं आहे शेड्यूल

T20 सीरीज

पहिली मॅच – 10 डिसेंबर, डरबन

दूसरी मॅच- 12 डिसेंबर, गबेखा (पोर्ट एलिजाबेथ)

तिसरा मॅच- 14 डिसेंबर, जोहान्सबर्ग

वनडे सीरीज

पहिली मॅच- 17 डिसेंबर, जोहान्सबर्ग

दूसरी मॅच- 19 डिसेंबर, पोर्ट एलिजाबेथ

तिसरी मॅच- 21 डिसेंबर, पार्ल

टेस्ट सीरीज

पहिली मॅच: 26-30 डिसेंबर, सेंचुरियन

दुसरी मॅच: 3-6 जानेवारी, केपटाऊन

सामन्यांची वेळ काय असेल?

T20 सीरीजची वेळ

भारतीय वेळेनुसार, T20 सीरीजमधील पहिला सामना संध्याकाळी 7.30 मिनिटांनी सुरु होईल. दुसरा आणि तिसरा T20 सामना रात्री 8.30 वाजता सुरु होईल.

वनडे सीरीजची वेळ

वनडे सीरीजमधील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेच्या हिशोबाने डे मॅच आहे. पण भारताच्या हिशोबाने हा डे-नाईट सामना आहे. पहिला वनडे सामना दुपारी 1.30 वाजता सुरु होईल. दुसरा आणि तिसरा वनडे सामना संध्याकाळी 4.30 वाजता सुरु होईल.

टेस्ट मॅचची वेळ

टेस्ट मॅचची सुरुवात भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 1.30 वाजता होईल.

कुठे पाहता येणार सामने?

भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्यांचे थेट प्रसारण होईल. हॉटस्टार एपवर सर्व सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग होईल.