Birthday Special : कधी पोलिसांचा मार खाल्ला, तर कधी प्रतिस्पर्धी खेळाडूला मैदानातच हाणले, जाणून घ्या हरभजन सिंगबद्दलच्या माहित नसलेल्या गोष्टी

| Updated on: Jul 03, 2021 | 11:25 AM

वडिलांच्या मृत्यूनंतर ड्रायव्हर होण्याचे ठरवणाऱ्या हरभजन सिंगला सौरव गांगुलीने पाठिंबा दिल्यानंतर त्याने 3 सामन्यांत 32 विकेट्स घेतल्या. तर याच हरभजन ज्याला भज्जी, टर्बनेटर अशा नावांनी ही बोलवले जाते त्याच्या वाढदिवसादिवशी जाणून घ्या त्याच्याबद्दल अनेकांना माहित नसलेल्या गोष्टी...

1 / 8
भारताने दिमाखात जिंकलेला 2007 चा टी-20 विश्वचषक असो किंवा 2011 चा एकदिवसीय विश्वचषक दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये
भारताचा प्रमुख फिरकीपटू म्हणून कामगिरी पार पाडणाऱ्या भारतीय ऑफ स्पिनर हरभजन सिंगचा (Harbhajan Singh Birthday) आज वाढदिवस. अनेकवेळा मैदानात आणि मैदानाबाहेरच्या 
कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत आलेल्या हरभजनचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 3 जुलै,1980 ला पंजाबच्या जलंधर येथे झाला होता. 41 वर्षांच्या हरभजन अजूनही अधिकृतरित्या
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त्त झाला नसल्याने त्याचे करियर जवळजवळ 23 वर्षांचे झाले आहे. (Indian Cricketer Spinner Harbhajan Singh Birthday Today Know some Unknown Things about harbhajan)

भारताने दिमाखात जिंकलेला 2007 चा टी-20 विश्वचषक असो किंवा 2011 चा एकदिवसीय विश्वचषक दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भारताचा प्रमुख फिरकीपटू म्हणून कामगिरी पार पाडणाऱ्या भारतीय ऑफ स्पिनर हरभजन सिंगचा (Harbhajan Singh Birthday) आज वाढदिवस. अनेकवेळा मैदानात आणि मैदानाबाहेरच्या कॉन्ट्रोवर्सीमुळे चर्चेत आलेल्या हरभजनचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 3 जुलै,1980 ला पंजाबच्या जलंधर येथे झाला होता. 41 वर्षांच्या हरभजन अजूनही अधिकृतरित्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त्त झाला नसल्याने त्याचे करियर जवळजवळ 23 वर्षांचे झाले आहे. (Indian Cricketer Spinner Harbhajan Singh Birthday Today Know some Unknown Things about harbhajan)

2 / 8
हरभजन सिंगचा जन्म एका व्यावसायिक परिवारात झाला होता. त्य़ाच्या वडिलांची एक फॅक्ट्री होती.पण आवड असल्याने हरभजनच्या वडिलांनी त्याला क्रिकेटवरच लक्ष देण्यास
सांगितले. पण हरभजन 20 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि सर्व जबाबदारी त्याच्यावर आली. पण तोवर भारताकडून एकदिवसीय सामन्यांत पदार्पण केलेल्या
हरभजनला हवा तसा सूर गवसला नव्हता. 18 वर्षाच्या वयाच 1998 मध्ये ऑस्ट्रेलियात टेस्ट आणि न्यूझीलंडमध्ये वनडे डेब्यू करणाऱ्या हरभजनचे
प्रदर्शन काही खास नसल्याने तो लवकरच संघातून बाहेर झाला. त्यात घरची जबाबदारीही अचानक आल्याने हरभजनने अमेरिकेला जाऊन ड्रायव्हर बनण्याचे ठरवले होते. पण क्रिकेट
जास्तकाळ त्याला आपल्यापासून लांब ठेवू शकले नाही.

हरभजन सिंगचा जन्म एका व्यावसायिक परिवारात झाला होता. त्य़ाच्या वडिलांची एक फॅक्ट्री होती.पण आवड असल्याने हरभजनच्या वडिलांनी त्याला क्रिकेटवरच लक्ष देण्यास सांगितले. पण हरभजन 20 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले आणि सर्व जबाबदारी त्याच्यावर आली. पण तोवर भारताकडून एकदिवसीय सामन्यांत पदार्पण केलेल्या हरभजनला हवा तसा सूर गवसला नव्हता. 18 वर्षाच्या वयाच 1998 मध्ये ऑस्ट्रेलियात टेस्ट आणि न्यूझीलंडमध्ये वनडे डेब्यू करणाऱ्या हरभजनचे प्रदर्शन काही खास नसल्याने तो लवकरच संघातून बाहेर झाला. त्यात घरची जबाबदारीही अचानक आल्याने हरभजनने अमेरिकेला जाऊन ड्रायव्हर बनण्याचे ठरवले होते. पण क्रिकेट जास्तकाळ त्याला आपल्यापासून लांब ठेवू शकले नाही.

3 / 8
डेब्यूनंतर काही सामने फ्लॉप गेलेल्या हरभजन 1999 नंतर संघाबाहेर गेला. पण 2001 मध्ये भारताचा प्रमुख फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) 
दुखापतग्रस्त झाल्याने हरभजनला ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये पुन्हा संधी देण्यात आली. मिळालेल्या संधीचे सोने करत हरभजनने धमाकेदार कामगिरी केली.
तीन सामन्यात 32 विकेट्स घेत हरभजन संघाचा लीडिंग विकेटटेकर बनला आणि त्यानंतर त्याने मागे वळून कधीच पाहिले नाही.

डेब्यूनंतर काही सामने फ्लॉप गेलेल्या हरभजन 1999 नंतर संघाबाहेर गेला. पण 2001 मध्ये भारताचा प्रमुख फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) दुखापतग्रस्त झाल्याने हरभजनला ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये पुन्हा संधी देण्यात आली. मिळालेल्या संधीचे सोने करत हरभजनने धमाकेदार कामगिरी केली. तीन सामन्यात 32 विकेट्स घेत हरभजन संघाचा लीडिंग विकेटटेकर बनला आणि त्यानंतर त्याने मागे वळून कधीच पाहिले नाही.

4 / 8
सर्व संघाच्या फलंदाजाना हैराण करुन सोडणारा हरभजन ऑस्ट्रेलिया संघाविरोधात वेगळ्याच लयीत दिसायचा. 
अत्यंत जोशात असणाऱ्या हरभजनवर ऑस्ट्रेलिया विरोधातील 2008 सालच्या सामन्यात अष्टपैलू एंड्रयू सायमंड्सवर वर्णभेदी टिप्पणी करण्याचा आरोप करण्यात आला होता.
त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तणाव वाढण्यास सुरुवात झाली बऱ्याच प्रयत्नानंतर हे संपूर्ण प्रकरण निवळले होते.

सर्व संघाच्या फलंदाजाना हैराण करुन सोडणारा हरभजन ऑस्ट्रेलिया संघाविरोधात वेगळ्याच लयीत दिसायचा. अत्यंत जोशात असणाऱ्या हरभजनवर ऑस्ट्रेलिया विरोधातील 2008 सालच्या सामन्यात अष्टपैलू एंड्रयू सायमंड्सवर वर्णभेदी टिप्पणी करण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तणाव वाढण्यास सुरुवात झाली बऱ्याच प्रयत्नानंतर हे संपूर्ण प्रकरण निवळले होते.

5 / 8
त्यानंतर 2008 सालीच हरभजन आणखी एका विवादात सापडला होता. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हरभजनने पंजाबविरुद्धच्या सामन्यात श्रीशांतला (Sreesant) भर मैदानात
कानाखाली लगावली होती. त्यामुळे त्याला संपूर्ण सीजनसाठी बॅन करण्यात आले होते.

त्यानंतर 2008 सालीच हरभजन आणखी एका विवादात सापडला होता. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या हरभजनने पंजाबविरुद्धच्या सामन्यात श्रीशांतला (Sreesant) भर मैदानात कानाखाली लगावली होती. त्यामुळे त्याला संपूर्ण सीजनसाठी बॅन करण्यात आले होते.

6 / 8
हरभजन सिंगला भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेचा उत्तराधिकारी म्हटलं जात होतं. पण 2008 मध्ये कुंबळेच्या निवृत्तीनंतर हरभजनही जास्त काळ संघात राहिला नाही.
 2011 साली वेस्ट इंडीज सीरीज आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान हरभजनला भारतीय संघातून बाहेर ठेवले गेले. 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधातच परत येत त्याने
100 वी कसोटी खेळली खरी पण 2015 मध्ये श्रीलंकेविरोधात त्याने शेवटची टेस्ट खेळली. त्यानंतर 2015 मध्येच दक्षिण आफ्रिकेविरोधातच भज्जीने शेवटची वनडे देखील खेळली.

हरभजन सिंगला भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेचा उत्तराधिकारी म्हटलं जात होतं. पण 2008 मध्ये कुंबळेच्या निवृत्तीनंतर हरभजनही जास्त काळ संघात राहिला नाही. 2011 साली वेस्ट इंडीज सीरीज आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान हरभजनला भारतीय संघातून बाहेर ठेवले गेले. 2013 मध्ये ऑस्ट्रेलिया विरोधातच परत येत त्याने 100 वी कसोटी खेळली खरी पण 2015 मध्ये श्रीलंकेविरोधात त्याने शेवटची टेस्ट खेळली. त्यानंतर 2015 मध्येच दक्षिण आफ्रिकेविरोधातच भज्जीने शेवटची वनडे देखील खेळली.

7 / 8
हरभजन सिंगने 103 टेस्टमध्ये में 417, 236 वनडेमध्ये 269 आणि 28 टी-20 सामन्यांत 25 विकेट्स घेतले आहेत.
फलंदाजीतही हरभजनने काही वेळा चमकदार कामगिरी दाखवली असून 3 हजार 569 आंतरराष्ट्रीय धावा हरभजनच्या नावे आहेत. सध्या तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायड़र्स (KKR) संघाकडून खेळतो.

हरभजन सिंगने 103 टेस्टमध्ये में 417, 236 वनडेमध्ये 269 आणि 28 टी-20 सामन्यांत 25 विकेट्स घेतले आहेत. फलंदाजीतही हरभजनने काही वेळा चमकदार कामगिरी दाखवली असून 3 हजार 569 आंतरराष्ट्रीय धावा हरभजनच्या नावे आहेत. सध्या तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायड़र्स (KKR) संघाकडून खेळतो.

8 / 8
हरभजनने 2015 मध्ये अभिनेत्री गीता बसरा (Geeta Basra) हिच्यासह विवाह रचला. बराच काळ डेटिंग केल्यानंतर हरभजनने लग्न केले असून
हे लग्न देखील काफी शानदार असे पार पडले होते.

हरभजनने 2015 मध्ये अभिनेत्री गीता बसरा (Geeta Basra) हिच्यासह विवाह रचला. बराच काळ डेटिंग केल्यानंतर हरभजनने लग्न केले असून हे लग्न देखील काफी शानदार असे पार पडले होते.