अफगाणिस्तान टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, कोण आत कोण बाहेर? जाणून घ्या

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. या मालिकेसाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात संघाची घोषणा करण्यात आली आहे.

अफगाणिस्तान टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, कोण आत कोण बाहेर? जाणून घ्या
अफगाणिस्तान टी20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, कोण आत कोण बाहेर? जाणून घ्या
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Sep 01, 2026 | 6:01 PM

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 13 सप्टेंबर 2026 पासून तीन सामन्याची टी20 मालिका सुरू होणार आहे. हे तिन्ही सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे असून संघात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. या संघात दुखापतीतून सावरलेल्या जसप्रीत बुमराह, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा आणि वॉशिंग्टन सुंदर यांचं पुनरागमन झालं आहे. पण त्यांच्या नावापुढे अजूनही स्टारमार्क केलं आहे. जसप्रीत बुमराह, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा यांचे खेळणे त्यांच्या पूर्ण फिटनेस क्लिअरन्सवर अवलंबून असेल. त्यामुळे ऐनवेळी काहीही बदल होण्याची शक्यता आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यात असलेले सूर्यांश शेडगे, रिंकु सिंह, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, यश ठाकुर, मयंक यादव आणि प्रभसिमरन सिंग यांना वगळण्यात आलं आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या मागील टी20 संघाच्या तुलनेत अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी मालिकेसाठीच्या संघात पाच मोठे बदल पाहायला मिळत आहेत. यात संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह यांसारख्या प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन झालं आहे.

या मालिकेसाठी पुन्हा एकदा अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ओपनिंग करताना दिसणार आहे. तर विकेटकीपरच्या भूमिकेसाठी संघात दोन पर्याय असणार आहे. यात संजू सॅमसन आणि इशान किशन आहेत. यापैकी कोणाला संधी मिळणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. तर अष्टपैलू म्हणून शिवम दुबे आणि अक्षर पटेल संघात आहेत. तसेच फिरकीची जबाबदारी वरूण चक्रवर्ती आणि रवि बिश्नोईच्या खांद्यावर असेल.

भारत अफगाणिस्तान टी20 सामन्यांचं वेळापत्रक

  • पहिला टी20 सामना: 13 सप्टेंबर 2026 (नवी दिल्ली)
  • दुसरा टी20 सामना: 15 सप्टेंबर 2026 (नवी दिल्ली)
  • तिसरा टी20 सामना: 17 सप्टेंबर 2026 (नवी दिल्ली)

अफगाणिस्तान टी20 मालिकेसाठी भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई,  जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, हर्षित राणा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us