चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा जीव वर खाली! लाहोरमध्ये भारताचा तिरंगा फडकला

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ पाकिस्तानात खेळणार नाही या भूमिकेवर ठाम राहिलं. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला झुकावं लागत हायब्रिड मॉडेलचा अवलंब करावा लागला. इतकंच काय तर भारताला कमी दाखवण्याचा डावही फसला आहे. कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये भारतीय झेंडा डौलाने फडकत आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा जीव वर खाली! लाहोरमध्ये भारताचा तिरंगा फडकला
| Updated on: Feb 19, 2025 | 3:22 PM

पाकिस्तान आणि त्याच्या कुरापती सर्व जगाला माहिती आहेत. त्यामुळे पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटा पडला आहे. दहशतवादाला खतपाणी घालत असल्याने कोणीही मदतीला पुढे येत नाही. त्यामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. पण इतकं असूनही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. भारताला कमी दाखवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एक प्रयत्न केला. पण संपूर्ण जगात नाचक्की झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तोंडावर आपटलं ठआहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कराची आणि लाहोर स्टेडियममध्ये सात संघांचे झेंडे लावले होते. पण भारताचा झेंडा काही लावला नव्हता. पण भारताची ताकद पाहून अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला झुकावं लागलं आहे. कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये भारताचा तिरंगा डौलाने फडकत आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना सुरु आहे. हा सामना सुरु असताना एका बाजूला भारताचा झेंडा डौलाने फडकत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड स्टेडियममध्ये भारतीय झेंडा न लावल्याने वादात अडकलं होतं. यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांना पीसीबीची शाळा घेतली होती. भारताचे सामने हायब्रिड मॉडेलवर दुबईत होणार आहेत. पाकिस्तानात भारतीय संघ खेळणार नसल्याने पीसीबीने असा निर्णय घेतला होता. मात्र आता तोंडावर पडण्याची वेळ आली आहे. दरम्यान, असं करताना कराची नॅशनल स्टेडियममध्ये चुकीने की जाणीवपूर्व भारताचा झेंडा उलटा लावला गेला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पीसीबीवर सर्वच स्तरातून टीका झाली आणि चूक दुरूस्त केली.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती खराब असून संपूर्ण देश कर्जबाजारी आहे. त्यामुळे पाकिस्तानला अजून आर्थिक मदत करण्यास इतर देशांनी नकार दिला आहे. चीनच्या तुकड्यावर पाकिस्तान आता जगत आहे. देशाची आर्थिक सुधारण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरु आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दोन पैसे मिळतील असं गणित आहे. दुसरीकडे, 29 वर्षानंतर पाकिस्तानात आयसीसी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.