IND vs ZIM – ODI सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनकडे कॅप्टन्सी, विराट कोहलीला पुन्हा विश्रांती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या दौऱ्यासाठी शनिवारी संघाची घोषणा केली. सर्वात मोठी बातमी म्हणजे ऑफस्पिन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि मध्यमगती गोलंदाज दीपक चहर यांचे दीर्घ दुखापतीनंतर अखेर संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर राहुल त्रिपाठी यांचीही फेरनिवड झाली आहे.

IND vs ZIM - ODI सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनकडे कॅप्टन्सी, विराट कोहलीला पुन्हा विश्रांती
| Updated on: Jul 30, 2022 | 9:14 PM

मुंबईः झिम्बाम्बे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. तीन मॅचच्या वनडे सीरीजसाठी शिखर धवन याच्याकडे पुन्हा कॅप्टन्सी देण्यात आली आहे. तर विराट कोहलीला पुन्हा विश्रांती देण्यात आलेली आहे. शिखर धवनसोबत रुतुराज गायकवाड, शुशमन गील, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेट किपर), संजू सॅमसन(विकेट किपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अनेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मदद सिराज आणि दीपक चहार यांच्या नावांचा समावेश आहे. तर कर्णधार रोहित शर्मासह अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना या मालिकेमध्ये विश्रांती देण्यात आली असून विराट कोहलीचीही या मॅचसाठी निवड करण्यात आली नाही.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या दौऱ्यासाठी शनिवारी संघाची घोषणा केली. सर्वात मोठी बातमी म्हणजे ऑफस्पिन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि मध्यमगती गोलंदाज दीपक चहर यांचे दीर्घ दुखापतीनंतर अखेर संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर राहुल त्रिपाठी यांचीही फेरनिवड झाली आहे.

सुंदरसाठी मोठी संधी

शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. दुखापती आणि फिटनेसच्या समस्येमुळे सुंदर बराच काळ बाहेर होता. सुंदर सध्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असल्याने त्याच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करणार आहेत.