IPL 2026, CSK vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला..
आयपीएल 2026 स्पर्धेतील 18व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर दबाव असणार आहे. कारण अद्याप खेळलेल्या तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 18व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा चौथा सामना आहे. आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची स्थिती नाजूक आहे. कारण तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सने तीन पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना हाताचा गमावला आहे. या सामन्यात तसं पाहिलं तर चेन्नई सुपर किंग्सवर दबाव असणार आहे. कारण जर या सामन्यात पराभव झाला तर पुढचा प्रवास कठीण होत जाणार आहे. नाणेफेकीचा कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार अक्षर पटेलने पर्थम गोलंदाजी स्वीकारली आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला प्रथम फलंदाजी करताना मोठं आव्हान ठेवावं लागणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करू इच्छितो कारण खेळपट्टी चांगली दिसत आहे. जी काही धावसंख्या असेल, तिचा पाठलाग करणे आम्हाला अधिक पसंत आहे. आयपीएल ही एक मोठी स्पर्धा आहे आणि ड्रेसिंग रूममधील वातावरण खूपच निवांत आहे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करण्यावर चर्चा सुरू आहे. एकदा आपण एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचलो की, गोष्टींचा जास्त विचार करण्याची गरज नाही. त्यामुळे, जे आपल्या हातात आहे त्यावर नियंत्रण ठेवणे, हीच आमची मानसिकता आहे. संघात दोन बदल आहेत. विप्रजच्या जागी नबी आणि नितीश राणाच्या जागी आशुतोष शर्मा खेळणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, खेळपट्टी थोडी कोरडी दिसतेय. नाणेफेकीबद्दल आम्ही खरंतर 50-50 होतो, पण स्वतःवर विश्वास ठेवणे चांगले आहे. आज सर्वोत्तम कामगिरी करणे, पहिला विजय मिळवणे आणि गुणतालिकेत स्थान मिळवणे हे आमचे ध्येय आहे. गेल्या काही सामन्यांपासून आम्ही हाच प्रयत्न करत आहोत. आम्ही सर्वच विभागांमध्ये सुधारणा करत आहोत. फलंदाजी खूप चांगली होत आहे, फक्त काही महत्त्वाच्या क्षणी आमच्याकडून चूक झाली आणि याच संधींचा फायदा घेणे आवश्यक आहे. आम्ही मॅट एडवर्ड्सच्या जागी गुरजपनीत सिंगला संघात घेतले आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग
चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), रुतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, सर्फराज खान, शिवम दुबे, डेवाल्ड ब्रेविस, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंग, खलील अहमद.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, केएल राहुल (विकेटकीपर), समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, औकिब नबी दार, लुंगी एनगिडी, कुलदीप यादव, टी नटराजन, मुकेश कुमार.