IPL 2021 RCB vs RR : विराटसेनेची 4 बलस्थानं, ज्यांच्या जोरावर राजस्थानला केलं चितपट

| Updated on: Sep 30, 2021 | 10:41 AM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव करत प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान पक्के केले आहे. बुधवारी दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या चॅलेंजर्सनी 17 चेंडू राखून सामना जिंकला.

1 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट्सने पराभव करत प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान पक्के केले आहे. बुधवारी दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या चॅलेंजर्सनी 17 चेंडू राखून सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने बंगळुरूला 150 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल बंगळुरूने ते 17.1 षटकांत पूर्ण केले. बंगळुरूच्या या विजयात युजवेंद्र चहल सामनावीर ठरला. मात्र, त्यांच्या विजयाची अनेक कारणे होती.

2 / 5
विराट -पडिक्कलची वेगवान फलंदाजी - राजस्थानकडून 150 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट आणि पडिक्कल यांनी संघाला झटपट सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 48 धावा जोडल्या. आयपीएलमध्ये 5 व्या वेळी, आरसीबी संघ पॉवरप्लेमध्ये 50 प्लस धावा करण्यात यशस्वी झाला. या फास्ट स्टार्टमुळे संघाचा विजय निश्चित झाला.

3 / 5
मॅक्सवेल आणि भरतची भागीदारी - विराट आणि पडिक्कलने संघाला चांगली सुरुवात दिली, तर मॅक्सवेल आणि भरतच्या भागीदारीने त्यावर विजयाची इमारत उभी केली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 55 चेंडूत 69 धावा जोडल्या. भरत 44 धावा करून बाद झाला. मॅक्सवेल 30 चेंडूत 50 धावांवर नाबाद राहिला.

4 / 5
बंगळुरूची धारदार गोलंदाजी - राजस्थानविरुद्ध पहिल्या 10 षटकांत बंगळुरूची गोलंदाजी चालली नाही. पण शेवटच्या 10 षटकांत त्याने बुलेट ट्रेनप्रमाणे वेग बदलला. ज्यामुळे राजस्थानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मधल्या षटकांमध्ये चहल, हर्षल आणि शाहबाज यांनी राजस्थानच्या एकामागोमाग एक विकेट घेत धावगतीला ब्रेक लावला. चहल आणि शाहबाज यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या तर हर्षलने 3 विकेट्स घेतल्या. गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे बंगळुरू संघ राजस्थानला 150 धावांच्या आत रोखण्यात यशस्वी झाला.

5 / 5
राजस्थानची मिडल ऑर्डर फ्लॉप - राजस्थानच्या मधल्या फळीतील फलंदाजांचा फ्लॉप शो बंगळुरूच्या विजयात मोठा घटक होता. यशस्वी आणि एव्हिन लुईस यांनी संघाला हवी तशी सुरुवात दिली. पण नंतर मधली फळी एकामागून एक कोसळत गेली आणि राजस्थान सामन्याचा ट्रॅक घसरू लागला. बंगळुरूने त्यांच्या या कमकुवत दुव्याचा फायदा घेतला.