IPL 2022 Final, GT vs RR : संजू सॅमसनच्या पत्नीने उडवली ब्रॉडकास्टरची खिल्ली, पोस्ट करत म्हणाली…

राजस्थानला कदाचित यंदा फारच कमी लोक विजयाचा दावेदार मानत होते. असे आम्ही नाही तर, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनची पत्नी म्हणते, सॅमसनची पत्नी चारुलता हिने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून तिचा पती संजूकडे पतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आयपीएल ब्रॉडकास्टरची खिल्ली उडवली आहे.

IPL 2022 Final, GT vs RR : संजू सॅमसनच्या पत्नीने उडवली ब्रॉडकास्टरची खिल्ली, पोस्ट करत म्हणाली...
संजू सॅमसनच्या पत्नीने उडवली ब्रॉडकास्टरची खिल्लीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 6:55 PM

मुंबई : राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघासाठी सीझनची सुरुवात ही वेदनादायी ठरली. कारण त्यांनी आपला माजी कर्णधार आणि मार्गदर्शक शेन वॉर्न (Shane Warn) गमावला होता. तेव्हापासून संघाने या दिग्गज खेळाडूसाठी चषक जिंकायचा (IPL 2022 Final) ध्यास घेतला आहे . आता राजस्थानने अंतिम फेरी गाठली आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली संघ आता 14 वर्षांनंतर विजेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. सीझन सुरू होण्यापूर्वीपूर्वी, राजस्थानला कदाचित यंदा फारच कमी लोक विजयाचा दावेदार मानत होते. असे आम्ही नाही तर, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनची पत्नी म्हणते, सॅमसनची पत्नी चारुलता हिने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून तिचा पती संजूकडे पतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या आयपीएल ब्रॉडकास्टरची खिल्ली उडवली आहे. संजू सॅमसनच्या पत्नीने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवाला आहे. राजस्थानचा संघ 2008 नंतर एकदाही फायनलमध्ये पोहोचला नव्हता.

चारुलताची पोस्ट काय?

चारुलताने तिच्या इंस्टाग्रामवर आयपीएल 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीबद्दल बनवलेल्या अॅनिमेटेड व्हिडिओबद्दलचा एक फोटो शेअर केला आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाचा समावेश नसला तरी या फोटोत सर्व संघांचे कर्णधार बाइकवर दिसत होते. चारुलताने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आयपीएल 2022 च्या पहिल्या दिवशीचा हा अॅनिमेटेड व्हिडिओ पाहिला. आणि आश्चर्य वाटले की गुलाबी जर्सी (राजस्थान रॉयल्स) का नाही. कदाचित राजस्थानला तेवढ्या योग्यतेचे समजत नसतील असे वाटते. मात्र आता तोच संघ फायनलमध्ये आहे, अशी पोस्ट करत तिने खिल्ली उडवली आहे. राजस्थान संघाने साखळी फेरीतील 14 पैकी 9 सामने जिंकले. त्यांनी 18 गुणांसह पॉईंट टेबलवर दुसरे स्थान मिळवले आणि प्लेऑफमध्ये प्रवेश केला. पहिल्या क्वालिफायरमध्ये संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते पण दुसऱ्या क्वालिफायरमध्ये त्यांनी आरसीबीवर शानदार विजय नोंदवला.

आजची फायनल कोण जिंकणार?

राजस्थानमध्ये आज फायनलमध्ये गुजरातचं आव्हान असणार आहे. क्वालिफायरमध्ये गुजरातचा संघच राजस्थानला हरवून थेट फायनलमध्ये पोहोचला होता. त्यामुळे आता ही फायनल कोण जिंकणार याकडे क्रिकेट रसिकांच्या नजरा लागल्या आहेत. गुजरातचं तगडं आव्हान राजस्थानसमोर असणार आहे.

हे सुद्धा वाचा

अशी सुरू झाली प्रेम कहाणी

संजू सॅमसनने चारुलताला फेसबुकवर फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली होती आणि तिथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. काही दिवस डेट केले आणि दोघांनीही आपली लग्नाची इच्छा घरच्यांना सांगितली, घरच्यांनीही थाटामाटात दोघांचे लग्न लावून दिले, 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांन लग्न केले. संजू सॅमसन ख्रिश्चन आहे, तर चारुलता हिंदू आहे. दोघांचे लग्न कोवलम शहरात झाले होते, ज्यामध्ये फार कमी लोक उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.