LSG vs RCB: टेबल टॉपर बनण्यासाठी लखनौ आणि बँगलोरमध्ये महामुकाबला

| Updated on: Apr 18, 2022 | 5:27 PM

विजयाच्या रथावर स्वार असलेले लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore IPL 2022) हे दोन संघ 19 एप्रिल रोजी आयपीएल 2022 च्या 31 व्या सामन्यात आमनेसामने असतील.

LSG vs RCB: टेबल टॉपर बनण्यासाठी लखनौ आणि बँगलोरमध्ये महामुकाबला
Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई : विजयाच्या रथावर स्वार असलेले लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore IPL 2022) हे दोन संघ 19 एप्रिल रोजी आयपीएल 2022 च्या 31 व्या सामन्यात आमनेसामने असतील. लखनौचे केएल राहुल (KL Rahul), क्विंटन डी कॉक, दीपक हूडा शानदार फॉर्ममध्ये आहेत तर बँगलोरचे फलंदाज दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सवेल यांच्यासमोर भले-भले गोलंदाज निष्प्रभ ठरल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या सामन्यात लखनौने मुंबई इंडियन्सचा तर आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. दोन्ही संघांचे सहा सामन्यांत आठ गुण आहेत आणि त्यांना विजयाची मालिका कायम ठेवायची आहे. या मोसमात दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ दाखवला आहे. लखनौसाठी हा आयपीएलचा पहिलाच हंगाम आहे. तर फाफ डू प्लेसिसच्या (Faf Du Plessis) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीचा संघदेखील चांगल्या फॉर्मात आहे.

लखनौविरुद्ध, आरसीबीला त्यांची आघाडीची फलंदाजी निश्चित करावी लागेल. पहिल्या सामन्यात कर्णधार फाफ डू प्लेसिसने चांगली खेळी केली. मात्र त्यापुढच्या सामन्यात त्याला सूर गवसला नाही. सलामीवीर अनुज रावतही सातत्यपूर्ण फॉर्ममध्ये नाही. विराट कोहलीची बॅटही शांत आहे आणि अनेकदा चांगली सुरुवात मिळूनही तो मोठी खेळी करु शकलेला नाही. मॅक्सवेलच्या आगमनाने त्यांची फलंदाजी मजबूत झाली आहे. या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने दिल्लीविरुद्ध 34 चेंडूत 55 धावा केल्या होत्या. त्याच वेळी, कार्तिक संघाला स्वबळावर सामने जिंकून देत आहे आणि त्याने आतापर्यंत फिनिशरची भूमिका उत्तमरित्या पार पाडली आहे. कार्तिक आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या सहा सामन्यांपैकी केवळ एकदाच बाद झाला आहे. तसेच तो प्रत्येक सामन्यात जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. गोलंदाजीत हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि वानिंदू हसरंगाने चांगली कामगिरी केली आहे.

लखनौचा दमदार खेळ

दुसरीकडे, लखनौचा कर्णधार राहुलने 235 धावा केल्या असून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने मुंबईविरुद्ध शतक ठोकले आणि सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जॉस बटलरच्या (272) मागे आहे. राहुलच्या नावावर बँगलोविरुद्धदेखील मोठा विक्रम आहे. डीकॉक देखील चांगल्या फॉर्ममध्ये आहे तर युवा खेळाडू आयुष बडोनी, दीपक हुडा आणि कृणाल पंड्या मोठी खेळी खेळू शकतात. जेसन होल्डर आणि मार्कस स्टॉयनिस या दोघांनी संघाला बळ दिलं आहे. सर्वांच्या नजरा वेगवान गोलंदाज आवेश खान आणि फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई यांच्यावर असतील.

लखनौचा संघ

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डीकॉक, मनीष पांडे, दीपक हुडा, क्रुणाल पंड्या, एविन लुईस, मार्कस स्टॉयनिस, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, काइल मेअर्स, आवेश खान, दुष्मंता चमिरा, रवी बिश्नोई, आयुष बडोनी, मनन वोहरा, कृष्णप्पा गौतम, शाहबाज नदीम, अंकित राजपूत, मयंक यादव, मोहसीन खान आणि करण शर्मा.

बँगलोरचा संघ

विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रदरफोर्ड, जेसन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार, सिद्धार्थ कौल.

इतर बातम्या

Umran Malik : इंग्रजांचे षटकार खेचून देणार हा गोलंदाज, उमरानच्या धडाकेबाज कामगिरीचं शशी थरूरांकडून कौतुक

IPL 2022, CSK vs GT, Purple Cap : गुजरातचा चेन्नईवर 3 गडी राखून विजय, पर्पल कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

IPL 2022, CSK vs GT, Orange Cap : चेन्नईला धुळ चारत गुजरातने सामना जिंकला, ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?